AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sherlyn Chopra : अभिनेत्री शर्लिन चोप्राकडून राज कुंद्रासोबतचा ‘तो’ फोटो शेअर

अश्लिल चित्रपट बनवल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या जेलमध्ये आहे. याप्रकरणात गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शर्लिन चोप्राचीही (Sherlyn Chopra) चौकशी केली होती. शर्लिनने राज कुंद्रांबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Sherlyn Chopra : अभिनेत्री शर्लिन चोप्राकडून राज कुंद्रासोबतचा 'तो' फोटो शेअर
Sherlyn Chopra
| Edited By: | Updated on: Aug 12, 2021 | 4:08 PM
Share

मुंबई : अश्लिल चित्रपट बनवल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या जेलमध्ये आहे. याप्रकरणात गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शर्लिन चोप्राचीही (Sherlyn Chopra) चौकशी केली होती. शर्लिनने राज कुंद्रांबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आता तर चर्लिन चोप्राने सोशल मीडियावर एक असा फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे अश्लिल सिनेमाप्रकरणाची नव्याने चर्चा होत आहे.

शर्लिनने जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये ती राज कुंद्रा यांच्यासोबत बसलेली दिसते. ज्यावेळी शर्लिन चोप्रा अॅपसाठी शूट करणार होती, त्यावेळचा हा फोटो आहे.

शर्लिनने शेअर केलेला फोटो

शर्लिन चोप्राने शेअर केलेला हा फोटो 2019 मधील आहे. “हा 29 मार्च 2019 चा दिवस होता. आम्स्प्राईमद्वारे आयोजित ‘द शर्लिन चोपड़ा’ अॅपच्या पहिल्या कंटेट शूटला सुरुवात होत होती. माझ्यासाठी हा नवा अनुभव होता. कारण मी कोणत्याही अॅपसाठी पहिल्यांदाच असं शूट करत होते. उत्साह आणि जोशपूर्ण वातावरण होतं”, असं शर्लिन चोप्राने हा फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

शर्लिनने हा फोटो शेअर केल्यानंतर तातडीने हो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो शेअर करताना, शर्लिनने राज कुंद्रांवर जे आरोप केले आहेत, त्याला दुजोरा देण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे.

शर्लिन चोप्राचे आरोप

शर्लिन चोप्राने 8 ऑगस्ट रोजी एएनआयशी बोलताना राज कुंद्राने मार्च महिन्यातच फिल्म बनवण्यासाठी आपल्याशी संपर्क केल्याचं म्हटलं होतं. शिवाय एक करारही झाला होता.

शर्लिन चोप्राचा राज कुंद्राबरोबरचा करार

सूत्रांनी सांगितले की, शर्लिन चोप्राचा राज कुंद्राच्या फर्म आर्म्सप्राइम मीडियाबरोबर करार होता. हा करार भारताबाहेर कंपन्यांच्या काही अ‍ॅप्ससाठी अश्लील सामग्री पुरवण्याचा होता. तिचे माजी वकील चरणजित चंद्रपाल यांच्या म्हणण्यानुसार शर्लिन तिचा अ‍ॅप सेमी पॉर्न पद्धतीने चालवत असे. तिचे हे पार्टटाईम काम फार चांगले चालले नव्हते आणि काही काळानंतर शार्लिनला कुंद्राने स्पॉट केले. राज कुंद्राने शर्लिन चोप्राला सांगितले की, तिला या बदल्यात 50% नफा मिळेल. राज यांनी स्वत: या करारावर सही केली होती.

काही दिवसांपूर्वीच राज कुंद्रा प्रकरणात शर्लिन चोप्राने एका कंपनीच्या नावाचा खुलासा केला होता, जी मॉडेलसाठी अ‍ॅप्स बनवते. शर्लिनने तिच्या एका व्हिडीओद्वारे हा दावा केला आहे.

त्याचबरोबर तिने असेही म्हटले होते की, मी पहिली व्यक्ती आहे जिने हे प्रकरण उघडकीस आणले. शार्लिनने असेही सांगितले होते की, तिने मार्च 2021मध्ये महाराष्ट्र सायबर सेलकडे आपले निवेदन नोंदवले होते. व्हिडीओमध्ये शर्लिन म्हणाली होती की, गेल्या अनेक दिवसांपासून या विषयावर माझे मत जाणून घेण्यासाठी अनेक पत्रकार माझ्याशी संपर्क साधत आहेत. मी तुम्हाला सांगते की, सायबर सेलसमोर मी पहिले विधान केले. सध्या हे प्रकरण चालू आहे, म्हणून मी यावर जास्त बोलणार नाही. जेव्हा मला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले, तेव्हा मी भूमिगत झाले नाही किंवा मी पळूनही गेले नाही.

राज कुंद्राला दिलासा नाही!

राज कुंद्राला (Raj Kundra) अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही. जामिनाची सुनावणी आता 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. राज कुंद्रा याला मुंबईच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी रात्री उशिरा अटक केली होती. त्यानंतर 20 जुलै रोजी कोर्टाने त्याला 3 दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर 23 जुलै रोजी पुन्हा सुनावणी झाली असता कोर्टाने राजला 27 जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती. आता पुन्हा यात वाढ करण्यात आली आहे.

राज कुंद्रा याच्या घरातून अनेक महत्त्वपूर्ण पुरावे सापडल्याचे क्राइम ब्रँचने कोर्टाला सांगितले आहे. अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या संदर्भात एका फॉरेन्सिक तज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने डेटा परत मिळवला जात आहे. राज यांच्या घरातून हार्ड डिस्क व मोबाईल सापडला आहे. आयओएसवर आरोपींकडून हॉटशॉट्स दाखवले जात असताना त्यांना Apple कडून 1 कोटी 13 लाख 64,886 रुपये मिळाले होते. ज्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा केली गेली होती ती कोटक महिंद्र बँक, येस बँक आणि अन्य बँक खाती गोठवली गेली आहेत. आता काही फरार आरोपींचाही शोध सुरू आहे.

संबंधित बातम्या  

20 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा!

Raj Kundra Case | अटक होण्याची भीती, चौकशी होण्यापूर्वीच शर्लिन चोप्राने ठोठावला कोर्टाचा दरवाजा

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.