ना नवा चित्रपट, ना कसलं सेलिब्रेशन तरी सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #SalmanKhan, पाहा नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेत्री महिमा मकवाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

ना नवा चित्रपट, ना कसलं सेलिब्रेशन तरी सोशल मीडियावर ट्रेंड होतोय #SalmanKhan, पाहा नेमकं प्रकरण काय?
Salman Khan
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 1:27 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेता आयुष शर्मा आणि अभिनेत्री महिमा मकवाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या दोघेही त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

‘दबंग’ सलमान खान नुकताच आयुष शर्मासोबत त्याच्या ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एके ठिकाणी गेला होता. जेथील एक व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमानसोबतचा एक चाहता फोटो क्लिक करण्यासाठी पुढे येतो.

सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला दूर लोटले…

ना नवा चित्रपट, ना कसलं सेलिब्रेशन तरी सोशल मीडियावर #SalmanKhan ट्रेंड होतोय. खरंतर सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक चाहता सलमानकडे येतो आणि त्याच्यासोबत सेल्फी घेण्यास विचारतो. तर, सलमान खान त्याला बाजूला होण्यास सांगतो. सलमान खानची ही वृत्ती चाहत्यांना आवडलेली नाही.

सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. तो कुठेही गेला तरी लोकांची झुंबड जमते आणि त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले जातात. अलीकडेच हा चाहत असेच कृत्य करताना दिसला आणि रागाने सलमान खानने त्याला पुढे जाण्यास सांगितले, परंतु त्याने ते मान्य केले नाही. सलमान खानचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चाहत्यांनी केले ट्रोल

सलमान खानचा हा व्हिडीओ विरल भयानी यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहते सतत कमेंट करत आहेत. एका यूजरने कमेंट केली की, ‘या कृत्यामुळे अनेक लोक स्तब्ध झाले आहेत.’ दुसरीकडे, दुसर्‍या यूजरने सलमानची बाजू सावरत लिहिले की, ‘दोन फूट अंतर आवश्यक आहे.’ त्याचवेळी, एका यूजरने लिहिले की, ‘सलमान भाईपासून आता 2 यार्डच्या अंतरावरच रहा.’

सलमानचे आगामी प्रोजेक्ट

‘अंतिम’बद्दल’ बोलायचे झाले तर, या चित्रपटात सलमान एका पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. तो सरदाराच्या भूमिकेत दिसत आहे. ‘अंतिम’ हा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित आहे. ही सलमान खानची होम प्रॉडक्शन टीम आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप पसंती मिळाली असून, आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.

सध्या सलमान खान ‘बिग बॉस 15’ होस्ट करताना दिसत आहे. ‘बिग बॉस 15’ मध्येही सलमानला खूप पसंत केले जात आहे. तो आता आयुष शर्मासोबत रणवीर सिंहचा शो ‘द बिग पिक्चर’मध्ये प्रमोशनसाठी येणार आहे.

हेही वाचा :

Tiku Weds Sheru | कंगना रनौतसाठी आनंदाचा दिवस! ‘पद्मश्री’सोबत होमप्रोडक्शनच्या ‘टिकू वेड्स शेरू’च्या फर्स्टलूकची भेट!

‘नट्टू काका’ गडा इलेक्ट्रॉनिक्समध्ये परतणार? ‘तारक मेहता..’मध्ये घनश्याम नायक यांच्या जागी नव्या अभिनेत्याची चर्चा!

Non Stop LIVE Update
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?
राणेंचं एक ट्विट अन् कोकणातील राजकारणात नवा ट्विस्ट,नेमकं काय म्हणाले?.
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?
मुंबईतील लोकसभेच्या जागांचा मविआचा फॉर्म्युला ठरला, कुठे कोण लढणार?.
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा
'मविआ'चा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणता पक्ष लढणार सर्वाधिक जागा.
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?
भाजपकडून कुणाला तिकीट? या 6 जणांची समिती ठरवणार, कोणाचा समितीत सहभाग?.
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब
'नमो महारोजगार मेळावा' कार्यक्रम पत्रिकेतून शरद पवार यांचं नावच गायब.
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय
सदावर्तेंना दिलासा,सनद निलंबित करण्यासंदर्भात बार काऊंसिलचा निर्णय काय.
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..
लोकसभा लढणार की नाही? पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव
भल्या मोठ्या अस्वलांची मंदिरात एन्ट्री, गेट उघडत प्रसादावर मारला ताव.
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल
भाजपच्या प्रविण दरेकर यांना कुणाची शिवीगाळ? ऑडिओ होतोय व्हायरल.
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?
अमित शाहांच्या 'त्या' वक्तव्यानंतर भाजप नेत्यानं सांगितलं सत्य?.