नागा चैतन्यच्या सक्सेस पार्टीत समंथा सामील नाही, ‘घटस्फोटा’च्या दिशेने सुरु झालाय प्रवास?

मंगळवारी नागा चैतन्यच्या 'लव्ह स्टोरी' (Love Story) चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत नागा चैतन्याचे वडील नागार्जुन देखील दिसले होते, चित्रपटाशी संबंधित स्टार कास्ट दिग्दर्शक टीम या सेलिब्रेशनमध्ये दिसली होती. पण, अभिनेत्याची पत्नी कुठेच दिसत नव्हती.

नागा चैतन्यच्या सक्सेस पार्टीत समंथा सामील नाही, ‘घटस्फोटा’च्या दिशेने सुरु झालाय प्रवास?
Naga Chaitanya-Samantha Akkineni
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 1:14 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून साऊथचा सुपरस्टार नागा चैतन्य (Naga Cahitanya) आणि त्याची पत्नी समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) यांच्यात घटस्फोटाच्या चर्चेच्या बातम्या येत आहेत. या सगळ्यात मंगळवारी नागा चैतन्यच्या ‘लव्ह स्टोरी’ (Love Story) चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत नागा चैतन्याचे वडील नागार्जुन देखील दिसले होते, चित्रपटाशी संबंधित स्टार कास्ट दिग्दर्शक टीम या सेलिब्रेशनमध्ये दिसली होती. पण, अभिनेत्याची पत्नी कुठेच दिसत नव्हती. नागा चैतन्याची सहकलाकार साई पल्लवी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कम्मूला देखील त्यांच्या संपूर्ण टीमसह या सेलिब्रेशनला पोहोचले होते.

नागा चैतन्याची फिल्म ‘लव्ह स्टोरी’ गेल्या शुक्रवारी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाली होती, जेथे मंगळवारपर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 20 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला होता. परंतु, नागा चैतन्याची पत्नी या आनंदात कुठेच दिसत नाही. त्यानंतर हे स्पष्ट झाले की या जोडीमध्ये अजूनही खूप फाटाफूट सुरू आहे.

पाहा फोटो :

आम्ही तुम्हाला सांगतो की, या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करताना सुद्धा एक अतिशय विचित्र पोस्ट दिसली होती. ज्यात या जोडीतील दुरावा स्पष्टपणे लक्षात आला आहे. समंथाने चैतन्याच्या ट्विटरवरून ‘लव्ह स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला, पण तिने त्यात चैतन्यला टॅगही केले नाही. अभिनेत्रीने साई पल्लवी आणि चित्रपटाच्या टीमला चित्रपटासाठी अभिनंदन केले, पण तिने चैतन्याचे नावही घेतले नाही.

समुपदेशनही निष्फळ

अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा अक्किनेनी यांनाही त्यांचे लग्न वाचवायचे होते, यामुळे त्यांनी समुपदेशन घेण्याचा निर्णय घेतला, पण त्याचाही विशेष फायदा झाला असे वाटत नाही. हे जोडपे त्यांच्या लग्नासंदर्भात माध्यमांमध्ये सुरू असलेल्या कोणत्याही बातमीला कोणतेही उत्तर देत नाही. याचा अर्थ असा की, माध्यमांमध्ये लिहिल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी एक प्रकारे बरोबर आहेत. दोघांच्या कौटुंबिक न्यायालयात समुपदेशन देखील केले गेले आहे, परंतु तरीही या जोडप्याला एकमेकांपासून वेगळे व्हायचे आहे.

पोटगी म्हणून मिळणार 50 कोटी!

येत्या 2 ते 3 महिन्यांत जर हे नाते असेच चालू राहिले तर घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होईल. दैनिक भास्करच्या मते, जर हा घटस्फोट झाला, तर घटस्फोटानंतर समंथाला पोटगी म्हणून एकूण 50 कोटी रुपये मिळतील. जुलै महिन्यात अभिनेत्रीने सोशल मीडियावरून तिचे आडनाव ‘अक्किनेनी’ काढून टाकले होते. यानंतर प्रत्येकाला या जोडीतील दुराव्याची बातमी मिळाली.

हेही वाचा :

Shilpa Shetty | ‘जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा त्याबदल्यात प्रेमाची अपेक्षा असते…’, शिल्पा शेट्टीची पोस्ट राज कुंद्रासाठी?

Drugs Case |  बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी होता फरार, सुशांत सिंह राजपूतचा मित्र कुणाल जानीला अखेर अटक!

Rakhi Sawant | तोकडे कपडे फिरंगी मैत्रिणी… राखी सावंत नव्या फोटोंमुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल!