Sanjay Dutt andMadhuri Dixit : सिनेमाच्या सेटवर फुललं संजय – माधुरी यांच्यांत प्रेम, एका घटनेमुळे सर्वकाही संपलं

Sanjay Dutt Madhuri Dixit Love Story: 'ती' एक धक्कादायक घटना, नाहीतर आज पती - पत्नी असते माधुरी - संजय? कोणती होती 'ती' घटना, ज्यामुळे दोघांच्या नात्याचा झाला अत्यंत वाईट अंत... आजही दोघे खासगी आयुष्यामुळे असतात चर्चेत...

Sanjay Dutt andMadhuri Dixit :  सिनेमाच्या सेटवर फुललं संजय - माधुरी यांच्यांत प्रेम, एका घटनेमुळे सर्वकाही संपलं
फाईल फोटो
| Updated on: Oct 17, 2025 | 11:11 AM

Sanjay Dutt Madhuri Dixit Love Story: अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनेता संजय दत्त आज त्यांच्या खासग आयुष्यात आनंदी आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा माधुरी आणि संजय यांच्या प्रेमाचे किस्से फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील चर्चेत होते. अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र कायम देखील केलं आहे. पण माधुरी – संजय यांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांच्या नात्याचा अंत अत्यंत वाईट झाला. त्या एका घटनेमुळे माधुरी आणि संजय कायमचे दुरावले गेले…

सांगायचं झालं तर, संजय दत्त याने 1987 मध्ये दिवंगत अभिनेत्री ऋचा शर्मा हिच्यासोबत लग्न केलं. लग्नानंतर संजय आणि ऋचा यांनी मुलीच जगात स्वागत देखील केलं. पण लग्न झालेलं असताना आणि एका मुलीचा बाप असताना देखील संजूबाबाचा जीव माधुरीवर जडला… ‘थानेदार’ सिनेमात दोघांनी पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर केली. त्यानंतर ‘साजन’ सिनेमाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरलं.

‘थानेदार’ नंतर, संजय आणि माधुरी यांनी ‘साजन’ सिनेमात एकत्र काम केलं, ज्यामध्ये सलमान खान देखील मुख्य भूमिकेत होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. सिनेमातील गाणी देखील हीट ठरले. याच सिनेमाच्या सेटवर माधुरी आणि संजय एकमेकांच्या प्रेमात पडले. पण दोघांच्या नात्याचा अंत फार लवकर झाला.

‘त्या’ घटनेनंतर संपलं संजय आणि माधुरी यांचं नातं…

1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘खलनायक’ सिनेमात देखील माधुरी आणि संजय यांनी एकत्र काम केलं. पण मुंबई बॉम्ब ब्लास्ट केसमध्ये संजय दत्त याचं नाव देखील समोर आलं. बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. या घटनेसाठी संजयला तुरुंगवासही भोगावा लागला. यानंतर माधुरीने स्वतःला अभिनेत्यापासून दूर केलं. त्यानंतर माधुरी आणि संजय कधीच एकत्र दिसले नाही. पण ‘कलंक’ सिनेमात दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली.

संजय दत्त याचे तीन लग्न…

मोठ्या अडचणीत असताना संजय याची पहिली पत्नी ऋचा शर्मा हिचं कॅन्सरने निधन झालं. 1996 मध्ये संजूबाबाच्या पत्नीने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर 1998 मध्ये अभिनेत्याने दुसरं लग्न रिया पिल्लई हिच्यासोबत केलं. पण तिच्यासोबत देखील अभिनेत्याचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

2008 मध्ये संजूबाबाचा दुसऱ्या पत्नीसोबत घटस्फोट झाला. त्यानंतर त्याच वर्षी अभिनेत्याने तिसरं लग्न केलं. संजय दत्त याने तिसरं लग्न स्वतः पेक्षा 19 वर्ष लहान दिलनवाझ शेख म्हणजे मान्यता दत्त हिच्यासोबत केलं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे… तर माधुरी हिने 1999 मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत लग्न केलं. अभिनेत्रीला दोन मुलं आहेत.