नाना पाटेकरांना दुसऱ्या अभिनेत्रीसोबत पाहून मनीषा कोईराला रागाने लालबुंद झाली, वाचा पुढे काय झालं…

मनीषा कोईरालाची नाना पाटेकर यांच्याशी जवळीक वाढली, त्यावेळी त्यांचे लग्न झाले होते, पण असे असतानाही मनीषा कोईराला नानाच्या प्रेमात पूर्णपणे अडकली होती.

नाना पाटेकरांना दुसऱ्या अभिनेत्रीसोबत पाहून मनीषा कोईराला रागाने लालबुंद झाली, वाचा पुढे काय झालं...
Nana-Manisha

मुंबई : अभिनेता मनीषा कोईराला (Manisha Koirala ) आणि अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) हे दोघेही चित्रपट जगतातील मोठे नाव आहेत. दोघेही त्यांच्या चित्रपटांसोबतच त्यांच्या वैयक्तिक नात्यामुळेही खूप चर्चेत होते. मनीषा कोईरालाची नाना पाटेकर यांच्याशी जवळीक वाढली, त्यावेळी त्यांचे लग्न झाले होते, पण असे असतानाही मनीषा कोईराला नानाच्या प्रेमात पूर्णपणे अडकली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले होते की, दोघांनीही लग्नाची तयारी केली होती.

नाना पाटेकर विवाहित आहेत हे मनीषा कोईराला यांना माहीत होते, पण असे असूनही त्यांच्या मनातील नानांवरचे प्रेम कधीच कमी झाले नाही. पण एके दिवशी शूटिंगच्या सेटवर असे काही घडले ज्यामुळे मनीषा कोईरालाचे हृदय पूर्णपणे तुटले. वास्तविक, मनीषा कोईरालाने  नाना पाटेकर यांना आणि अन्य एका अभिनेत्रीला एकत्र पकडले होते. यानंतर प्रकरण इतके वाढले होते की हाणामारीपर्यंत मजल गेली होती.

अग्नी साक्षीच्या वेळी घडली घटना

खरं तर ही घटना 1996 मध्ये आलेल्या ‘अग्नी साक्षी’ चित्रपटादरम्यान घडली होती. या चित्रपटात नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ आणि मनीषा कोईराला यांनी एकत्र काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन पार्थो घोष यांनी केले होते. नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्या नात्याची बातमी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच गाजली होती. असं म्हटलं जातं की, मनीषा कोईराला नाना पाटेकरांवर इतकं प्रेम करत होती की, तिने स्वतःला त्यांच्या म्हणण्यानुसार बद्लायला सुरुवात केली होती.

नाना पाटेकर यांच्याशी लग्न करण्यास तयार होती अभिनेत्री!

माध्यम वृत्तांवर विश्वास ठेवला तर मनीषा कोईराला नाना पाटेकर यांच्या एवढ्या प्रेमात होती की, ते विवाहित असल्याचे माहीत असतानाही त्यांच्याशी लग्न करण्यास तयार झाली होती. तथापि, आधीच विवाहित नाना मनीषा कोईरालाला वचनबद्धता देऊ शकले नाहीत. पण मनीषाचा नाना पाटेकरांवर पूर्ण विश्वास होता, त्यामुळेच ती त्यांची वाट पाहत होती. हळूहळू मनीषा नानांसाठी खूप सकारात्मक झाली. नाना पाटेकरांसोबत इतर कोणत्याही अभिनेत्रीला बघायलाही तिला आवडत नव्हते.

दुसऱ्या अभिनेत्रीला पाहून मनीषा भडकली!

‘अग्नी साक्षी’च्या शूटिंगदरम्यान मनीषा कोईराला अचानक नाना पाटेकर यांच्या मेकअप रुममध्ये गेली, पण तिथे तिने जे पाहिले ते पाहून ती पूर्णपणे स्तब्ध झाली. वास्तविक मनीषाने नाना पाटेकरांना आणखी एका अभिनेत्रीसोबत पाहिले होते. पॅकअप करून मनीषा नाना पाटेकर यांच्या खोलीत पोहोचली, तेव्हा आयेशा जुल्का तिथे उपस्थित होती.

हाणामारीवर आले होते प्रकरण

मनीषा कोईरालाने आयेशा जुल्काला मेकअप रूममध्ये पाहताच तिच्यावर ओरडायला सुरुवात केली. आयशा जुल्का हिला मनीषाचे असे वागणे आवडले नाही. दोघी एकमेकांवर इतक्या चिडल्या की, हाणामारी पर्यंत गोष्ट गेली. मात्र, नाना पाटेकर यांनी कसे तरी मध्यस्थी करून हा संघर्ष शांत केला.

हेही वाचा :

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर पहिल्यांदाच सोशल मीडियावर दिसली शहनाझ गिल, अभिनेत्याला देणार अनोखी श्रद्धांजली!

Aryan Khan Drug case : ‘हे सगळं दुखःद आहे…’, पुन्हा एकदा आर्यन खानच्या समर्थनार्थ पुढे आला हृतिक रोशन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI