Shah Rukh Khan | किंग खान शाहरुखला विमानतळावर तासभर रोखलं, कसून चौकशी; काय घडलं नेमकं?

गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान पठाण चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.

 Shah Rukh Khan | किंग खान शाहरुखला विमानतळावर तासभर रोखलं, कसून चौकशी; काय घडलं नेमकं?
| Updated on: Nov 12, 2022 | 2:40 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याला मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने रोखले असल्याची बातमी पुढे येतंय. शुक्रवारी रात्री उशीरा हा प्रकार घडल्याचे कळत आहे. कस्टम विभागाने तब्बल एक तास शाहरुख खानची चाैकशी केली. शाहरुख खानला मोठा दंड भरावा लागलाय. यावेळी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी देखील सोबत होती. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खान पठाण चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. मात्र, मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने शाहरुख खानला रोखल्याने आता विविध चर्चांना उधाण आलंय.

मिळालेल्या माहितीनुसार बॅगेमध्ये महागड्या घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडले आहेत. भारतामध्ये लाखो रुपयांची घड्याळे आणण्यात आली. या घड्याळाची किंमत लाखो रूपये आहे. मात्र, याची कस्टम ड्युटी न भरल्याने शाहरुख खानची चौकशी करण्यात आली. या सर्व प्रकारात शाहरुख खानसोबत त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि बाॅडीगार्डला विमानतळावरच रोखण्यात आले.

शाहरुख खान एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खाजगी चार्टर VTR-SG ने टीमसोबत दुबईला गेला होता. काल मध्यरात्री या खाजगी चार्टर विमानाने मुंबईला परतला. यावेळी कस्टम विभागाला शाहरुख खान आणि त्याच्या टीमच्या बॅगमध्ये लाखो रुपयांचे घड्याळे आणि घड्याळांचे रिकामे बॉक्स सापडले. यानंतर कस्टम विभागाने चाैकशी करत सांगितले की, या घड्याळांवर लाखो रुपयांचा कर भरावा लागेल.

ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी जास्त वेळ लागणार होता. शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर चाैकशीनंतर घरी निघून गेले. मात्र, शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी तिथेच थांबला आणि सर्व प्रतिक्रिया पूर्ण करत दंड भरून सकाळी आठ वाजता गेला. 6 लाख 87 हजार रुपयांचा दंड रवीने भरला आहे. विशेष म्हणजे याचे सर्व बिल रवीचाच नावाने तयार करण्यात आले आहे. आता या सर्व कारवाईची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताना दिसत आहे.