Shahrukh Khan: किंग खानच्या घरी गणपती बाप्पा विराजमान, ‘मन्नत’मध्ये बाप्पाची विधीवत पूजा

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या घरी बाप्पा विराजमान झालाय. मन्नत या शाहरुखच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाला

Shahrukh Khan: किंग खानच्या घरी गणपती बाप्पा विराजमान, मन्नतमध्ये बाप्पाची विधीवत पूजा
| Edited By: | Updated on: Sep 02, 2022 | 12:29 PM

मुंबई : कोरोनाचं सावट दूर झाल्यानंतर यंदा दिमाखात गणेशोत्सव दिमाखात साजरा केला जातोय. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या घरीही बाप्पा विराजमान झालाय. मन्नत या शाहरुखच्या घरीही गणपती बाप्पा विराजमान झाला. बाप्पाच्या आगमनावेळी ‘मन्नत’मध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. शाहरुखच्या घरी बाप्पाची विधीवत पूजा करण्यात आली. शाहरुख खानने सोशल मीडियावर आपल्या घरातील गणपती बाप्पाचे फोटो शेअर केले आहेत. त्याने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

इन्स्टा पोस्ट

शाहरुख खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर घरातील गणपतीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने गणपतीजीगणपती म्हटलं की स्वादिष्ट मोदक आलेच. बाप्पा मला अधिकाधिक काम करण्याचं बळ देवो. सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा,असं कॅप्शन त्याने दिलंय. त्याच्या पोस्टला साडे नऊ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केलंय.

सलमानच्या घरीही बाप्पा

बॉलिवुडचा दबंग खान अर्थात सलमान खानच्या घरीही दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्याच्या घरच्या बाप्पाचं काल दीड दिवसानंतर विसर्जन करण्यात आलं.

सेलिब्रिटींच्या घरचा बाप्पा

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाला होता. तिने का भरल्या डोळ्यांनी बाप्पाला निरोप दिला. अभिनेते जितेंद्र कपूर यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले. यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करत असल्याचं तुषार कपूर म्हणाला. गेली दोन वर्ष अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला गेला. पण यंदा मात्र धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केल्याचं त्याने सांगितलं.