राज कुंद्राच्या अटकेनंतर पहिल्यांदाच चाहत्यांसमोर येणार शिल्पा शेट्टी, ‘या’ विषयावर करणार फेसबुक लाईव्ह!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या अटकेनंतर पहिल्यांदाच चाहत्यांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. माध्यम अहवालानुसार, शिल्पा 15 ऑगस्ट रोजी "वी फॉर इंडिया"च्या माध्यमातून फेसबुक लाईव्हवर करणार आहे.

राज कुंद्राच्या अटकेनंतर पहिल्यांदाच चाहत्यांसमोर येणार शिल्पा शेट्टी, ‘या’ विषयावर करणार फेसबुक लाईव्ह!
शिल्पा शेट्टी

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या अटकेनंतर पहिल्यांदाच चाहत्यांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. माध्यम अहवालानुसार, शिल्पा 15 ऑगस्ट रोजी “वी फॉर इंडिया”च्या माध्यमातून फेसबुक लाईव्हवर करणार आहे.

शिल्पा शेट्टी ‘गिव्ह इंडिया’ मोहिमेत सामील होणार

शिल्पा व्यतिरिक्त, या मोहिमेत अर्जुन कपूर (Arjun Kapoor), विद्या बालन  (Vidya Balan), दिया मिर्झा (Dia Mirza), एड शीरन (Ed Sheeran) , करण जोहर (Karan Johar), परिणीती चोप्रा (Parineeti Chopra), सैफ अली खान (Saif Ali Khan), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि स्टीव्हन स्पीलबर्ग, संगीतकार ए आर रहमान, रोलिंग स्टोन्सचे मिक जॅगर, गायक-गीतकार एड यांचा देखील समावेश आहे.

25 कोटींपेक्षा जास्त निधी गोळा करणार

हे सर्व कलाकार स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी एकत्र येतील आणि ‘गिव्ह इंडिया’ कोविड-19 मदत मिशनसाठी 25 कोटी रुपयांहून अधिक निधी उभा करतील. या मोहिमेद्वारे गोळा केलेला निधी कोरोनाव्हायरस महामारी, ऑक्सिजन सांद्रक, व्हेंटिलेटर, आवश्यक औषधे आणि आयसीयू युनिट्ससाठी येणाऱ्या खर्चातून सामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी वापरला जाईल. लसीकरण केंद्रांच्या कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठीही हा निधी वापरला जाईल.

राज कुंद्राच्या प्रकरणामुळे समाजापासून दूर राहतेय अभिनेत्री

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यावर अश्लील चित्रपट बनवण्याचा आणि ते प्रसारित करण्याचा आरोप आहे. राज यांच्या विरोधात पोलिसांकडे सबळ पुरेसे पुरावे आहेत. तो यात मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जाते आहे. राज यांना 19 जुलै रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. जेव्हापासून राजबद्दल नकारात्मक बातम्या आल्या आहेत, तेव्हापासून शिल्पाने सोशल मीडियापासून आणि इतर गोष्टींपासून अंतर ठेवले आहे. एवढेच नाही तर, तिने सुपर डान्सर शोपासूनही लांब राहणे सोयीस्कर समजले. या प्रकरणानंतर शिल्पा सार्वजनिक ठिकाणी येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

शिल्पाने पोस्ट लिहून लोकांना केले आवाहन

अलीकडेच शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली की, गेले काही दिवस खूप कठीण गेले. आमच्यावर अनेक अफवा आणि आरोप झाले आहेत. माध्यमांनी माझ्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. केवळ मलाच नाही तर माझ्या कुटुंबालाही ट्रोल केले गेले. मुंबई पोलीस आणि भारतीय न्याय संस्थेवर माझा पूर्ण विश्वास असल्याचेही तिने म्हटले आहे.

(Shilpa Shetty will be appearing in front of fans for the first time after the arrest of Raj Kundra)

हेही वाचा :

भुताटकीच्या अफवेतून चित्रपटाची कथा गवसली, ‘आयेगा आनेवाला’ने लता मंगेशकरांना ओळख मिळवून दिली!

पहिलाच चित्रपट सुपरहिट त्यानंतर झाला गायब, 9 वर्षानंतर थेट ‘बिग बॉस’मध्ये! जाणून घ्या कोण आहे करण नाथ?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI