AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | …जेव्हा ‘बिग बी’ छोट्या श्वेता आणि अभिषेकची ओळख करून देतात! पाहा Throwback Video

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुलगी श्वेता बच्चन (Shweta Bachchan-Nanda) कदाचित चित्रपट विश्वापासून दूर असेल, पण तिची फॅन फॉलोव्हिंग बरीच मजबूत आहे. श्वेताच्या चाहत्यांची यादी देखील खूप मोठी आहे.

Video | ...जेव्हा ‘बिग बी’ छोट्या श्वेता आणि अभिषेकची ओळख करून देतात! पाहा Throwback Video
बच्चन कुटुंब
| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 9:05 AM
Share

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुलगी श्वेता बच्चन (Shweta Bachchan-Nanda) कदाचित चित्रपट विश्वापासून दूर असेल, पण तिची फॅन फॉलोव्हिंग बरीच मजबूत आहे. श्वेताच्या चाहत्यांची यादी देखील खूप मोठी आहे. श्वेता बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. अशा परिस्थितीत आता श्वेताने चाहत्यांसाठी एक खूप जुना व्हिडीओ शेअर केला आहे, जो आता व्हायरल होत आहे (Shweta Bachchan Share throwback video on social media).

सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेली श्वेता रोज चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशा परिस्थितीत श्वेताने आता एक व्हिडीओ शेअर करुन आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या व्हिडीओमध्ये लहान श्वेतासोबत भाऊ अभिषेक बच्चनही दिसला आहे.

जेव्हा अमिताभ ओळख करून देतात…

श्वेताने चाहत्यांसोबत शेअर केलेला हा व्हिडीओ खूप जुना आहे. या कारणास्तव त्यात काहीही स्पष्ट दिसत नाही. मात्र, व्हिडीओमध्ये आपण पाहु शकता की, अमिताभ बच्चन अभिषेक आणि श्वेताला स्टेजवर बोलवतात. एकच नाही तर बिग बींनी आपल्या दोन मुलांची प्रेक्षकांशी ओळख करून दिली. यासह, अमिताभ बच्चन यांच्या आदेशानुसार दोन्ही मुले माईकवर हॅलो देखील म्हणत. यानंतर आपण पुन्हा अभिषेक आणि श्वेता तिथून निघून जातात.

अमिताभ, अभिषेक आणि श्वेताचा हा न पाहिलेला व्हिडीओ पाहून चाहते खूप आनंदित झाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना श्वेता बच्चन यांनी लिहिले की, ‘तुम्ही माला शोधत आहात का?’ श्वेताने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाहा श्वेताची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by S (@shwetabachchan)

बिग बींची लाडकी श्वेता

लेक श्वेता बच्चन ही अमिताभ बच्चन यांच्या अगदी जवळ आहे आणि त्यांची खूप लाडकी देखील आहे. अनेकदा चाहत्यांना अमिताभ आणि श्वेताचे बॉन्डिंगही पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा अमिताभ बच्चन यांना संधी मिळते, तेव्हा ते आपल्या मुलीचे मन मोकळेपणाने कौतुक करतात. श्वेता स्वत: आता दोन मुलांची आई आहे.

अमिताभ बच्चन यांचा ‘चेहरे’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात अमिताभसोबत इमरान हाश्मी आणि रिया चक्रवर्तीही दिसणार आहेत. हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘झुंड’सारखे अनेक चित्रपट बिग बींकडे आहेत. छोट्या पडद्यावर अमिताभ बच्चन पुन्हा केबीसी होस्ट करताना दिसणार आहे.

(Shweta Bachchan Share throwback video on social media)

हेही वाचा :

फरहान अख्तरच्या ‘तूफान’चा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार, नव्या पोस्टरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता!

Goodbye College | आता वडिलांचं स्वप्न साकार करणार, इरफान खानचा लेक बाबिलने शिक्षणाला म्हटले ‘अलविदा’

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.