AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पलक हिची आर्यन आणि इब्राहिमसोबत अफेअरची चर्चा ऐकून श्वेता तिवारीला धक्का, थेट लेकीला विचारला जाब

श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याच्या आगामी चित्रपटातून पलक ही बाॅलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. मात्र, पलक तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये पलक तिवारी हिने काही दिवसांपूर्वी मोठा खुलासा केलाय.

पलक हिची आर्यन आणि इब्राहिमसोबत अफेअरची चर्चा ऐकून श्वेता तिवारीला धक्का, थेट लेकीला विचारला जाब
| Updated on: Apr 18, 2023 | 10:03 PM
Share

मुंबई : श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पलक तिवारी हिचे एक मोठ स्वप्न पूर्ण होत आहे. पलक तिवारी ही बाॅलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. विशेष म्हणजे पहिल्याच चित्रपटामध्ये थेट सलमान खान याच्या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी ही पलक तिवारी हिला मिळालीये. सलमान खान (Salman Khan) याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये पलक तिवारी ही महत्वाच्या भूमिकेत आहे. पलक तिवारी ही तिच्या बोल्ड लूकमुळे ओळखली जाते. अनेकदा बोल्ड फोटोशूटमुळे (Photoshoot) ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील येते. गेल्या काही दिवसांपासून पलक तिवारी ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलीये.

पलक तिवारी ही सैफ अली खान याचा लेक इब्राहिम अली खान याचा डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. इतकेच नाही तर तिचे नाव शाहरूख खान याचा लेक आर्यन खान याच्यासोबत देखील जोडले जात आहे. मध्यंतरी चर्चा होती की, इब्राहिम अली खान याला सोडून आता आर्यन खान याला पलक तिवारी ही डेट करत आहे.

नुकताच पलक तिवारी हिने एक मुलाखत दिलीये. यावेळी पलक तिवारी हिने सांगितले की, माझ्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या की, माझ्या आईला टेन्शन येते. बऱ्याच वेळा ती मला काही फोटो आणि लिंक पाठवते आणि विचारते हे नेमके काय सुरू आहे. मी तिला सांगते की, हे काहीच सुरू नाहीये, या फक्त अफवा आहेत. मात्र, माझे नाव कोणासोबतही जोडले गेली की, ती मला हे काय आहे हे विचारत राहते.

पलक तिवारी हिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता की, आर्यन खान हा खूप चांगला आहे. तो जसा दिसतो तसाच आहे. पार्टीमध्ये वगैरे तो सर्वांसोबत खूप चांगला राहतो. एका वेळेनंतर तो खूप चांगला मित्र होतो. पलक तिवारी हिचे आर्यन खान याच्याबद्दलचे बोलणे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसला होता.

इब्राहिम अली खान याच्याबद्दल देखील बोलताना पलक तिवारी दिसली होती. इब्राहिम अली खान याच्याबद्दल बोलताना पलक तिवारी म्हणाली की, मी आणि इब्राहिम काही खास मित्र नाहीत, जेवढे लोक समजतात तेवढे. आम्ही कोणत्याही पार्टीमध्ये भेटलो तर एकमेकांना बोलतो. मी अजूनही पर्सनलमध्ये कधीच इब्राहिम याला भेटले नाहीये. त्याला माहिती आहे की, मी सलमान खान याच्यासोबत चित्रपट करत आहे. मात्र, त्याने अजूनही मला यावर काही बोलला नाहीये.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.