तो कोरोना वॅक्सिन घेण्यासाठी सरकारी दवाखान्यात गेला आणि हार्ट अटॅक आला, साऊथ स्टार विवेकची चटका लावणारी एक्झिट

कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर अभिनेते विवेक यांचं निधन झालं (Actor Vivek dies of heart attack)

तो कोरोना वॅक्सिन घेण्यासाठी सरकारी दवाखान्यात गेला आणि हार्ट अटॅक आला, साऊथ स्टार विवेकची चटका लावणारी एक्झिट
अभिनेते विवेक
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 8:57 AM

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेते विवेक (Actor Vivek) यांचं चेन्नईच्या एका खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 16 एप्रिलला त्यांना हार्ट अटॅक आला होता. कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर अभिनेते विवेक यांचं निधन झालं आहे. त्यामुळे हार्ट अटॅक आणि कोरोनाचं काही नातं आहे का याच्यावरही आता पुन्हा चर्चा सुरु झालीय. दरम्यान विवेक यांच्या अकाली एक्झिटनं टॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. (South Actor Vivek dies of heart attack in Chennai after taking COVID vaccine)

नेमकं काय घडलं?

अभिनेते विवेक हे 59 वर्षांचे होते. 15 एप्रिलला त्यांनी सरकारी दवाखान्यात जाऊन मित्रासोबत कोविडचा पहिला डोस घेतला. त्यानंतर 16 एप्रिलला त्यांना हार्ट अटॅक आला. चेन्नईच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये विवेक यांना भरती करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना ECMO ट्रिटमेंट सुरु केली. ते ICU मध्येच डॉक्टरांच्या निगराणीखाली होते. विवेक यांची तब्येत गंभीर होती. शेवटी आज पहटे 4.45 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

कोविडच्या डोसनंतर काय म्हणाले होते विवेक?

विशेष म्हणजे अभिनेते विवेक यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलऐवजी सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. Omandurar इथं हा डोस घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी चर्चाही केली होती. लस घेतल्यानंतर विवेक म्हणाले होते, मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोविड लस घेणं एकदम सेफ आहे. ही लस घेतली तर आपण आजारी पडणार नाही का, असं तुम्हाला वाटत असेल, पण तरीही लक्ष ठेवावंच लागेल. वॅक्सिनमुळे आपली रिस्क कमी होईल हे मात्र निश्चित. (South Actor Vivek dies of heart attack in Chennai after taking COVID vaccine)

पद्मश्रीने सन्मानित विवेक

अभिनेते विवेक यांनी अनेक तामिळ सिनेमात काम केलं. ते कॉमेडी भूमिकाही छान करायचे. त्यांनी फिल्मी करिअरमध्ये अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. त्यात रजनीकांत, कमल हसन, अजित, विजय, माधवन, विक्रम या स्टार्सचा समावेश आहे. माधवनची फिल्म रन ही विवेक यांची सर्वात मोठी फिल्म मानली जाते. सिनेमातल्या योगादानासाठी विवेक यांनी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या :

Satish Kaul | ‘महाभारता’च्या ‘देवराज इंद्रा’चे निधन, कोरोनाने हिरावला आणखी अभिनेता

(South Actor Vivek dies of heart attack in Chennai after taking COVID vaccine)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.