Satish Kaul | ‘महाभारता’च्या ‘देवराज इंद्रा’चे निधन, कोरोनाने हिरावला आणखी अभिनेता

प्रसिद्ध टीव्ही सीरियल ‘महाभारता’त इंद्रदेवाची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल (Satish Kaul) यांचे 10 एप्रिल रोजी सकाळी निधन झाले आहे. सतीश कौल यांना कोरोनाची लागण झाली होती.

Satish Kaul | ‘महाभारता’च्या ‘देवराज इंद्रा’चे निधन, कोरोनाने हिरावला आणखी अभिनेता
सतीश कौल
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 4:25 PM

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही सीरियल ‘महाभारता’त इंद्रदेवाची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल (Satish Kaul) यांचे 10 एप्रिल रोजी सकाळी निधन झाले आहे. सतीश कौल यांना कोरोनाची लागण झाली होती. ते 74 वर्षांचे होते. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विटद्वारे अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली आहे. हिंदी आणि पंजाबी चित्रपटांसह त्यांनी सुमारे 300 चित्रपटांत काम केले. ‘महाभारत’, ‘सर्कस’ आणि ‘विक्रम बेताल’ यासारख्या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमांमध्ये काम करूनही 74 वर्षीय सतीश कौल यांचे आयुष्य आजारपण आणि हालाखीत जात होते (Mahabharat Fame Actor Satish Kaul died due to corona).

लुधियाना येथील एका छोट्या घरात राहणारे सतीश कौल यांनी गेल्या वर्षी एका मुलाखतीत सांगितले होते की, दरमहा भाड्यासाठी 7500 रुपये द्यावे लागतात व औषधांच्या खर्चासाठीही त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. लॉकडाऊनमुळे त्यांच्याकडे पैसेदेखील नव्हते.

दोन वेळच्या अन्नाची भ्रांत!

कोरोना संकटामुळे समाजातील अनेक घटकांना समस्यांचा सामना करावा लागला. सामान्य नागरिकांसह काही वयोवृद्ध आणि आजारी कलाकारांनादेखील या परिस्थितीने हतबल झाले होते. रामानंद सागर यांच्या महाभारत या मालिकेत ‘इंद्र’देवाची भूमिका साकारणारे अभिनेते सतीश कौल यांनीदेखील औषधांसाठी लोकांकडे मदत मागितली होती. त्यांच्याकडे दोनवेळच्या अन्नासाठी देखील पैसे नव्हते. कोणी तरी औषधे द्या, अशी याचना ते करत होते (Mahabharat Fame Actor Satish Kaul died due to corona).

सतीश कौशिक यांची कारकीर्द

‘महाभारत’ मालिकेबरोबरच ‘आंटी नंबर १’, ‘कर्मा’, ‘जंजीर’, ‘खेल’, ‘राम लखन’, ‘खुनी महल’ यांसारखे सुपरहिट चित्रपटांमधून त्यांनी काम केले होते. एकेकाळी कोट्यावधीची संपत्ती असणारे सतीश कौल आज हलाखीचे जीवन जगत आहेत. चित्रपटांमधून मिळालेल्या संपत्तीतून त्यांनी अभिनय शाळा सुरु केली होती. मात्र ती नीट चालली नाही. यामुळे त्यांच्याजवळ असलेला सगळा पैसा संपला. त्यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगा देखील त्यांना सोडून अमेरिकेत स्थायिक झाले होते.

लॉकडाऊन दरम्यान एका वृत्तसंस्थेशी बोलताना सतीश यांनी सांगितले होते की, ते सध्या लुधियानातील एका भाड्याच्या घरात राहत असून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहेत. या आधी ते वृद्धश्रमात राहत होते. लॉकडाऊनमुळे त्यांची परिस्थिती अजून खराब झाली होती. औषधे, जेवण आणि इतर गोष्टींसाठी त्यांना संघर्ष करावा लागत होता. त्यांनी म्हटले होते की, अभिनेता म्हणून मला प्रेम दिलेत आता माणूस म्हणून मला मदत करा, अशी विनवणी त्यांनी केली होती. अभिनयाची भूक अद्याप शमली नसून, कुठलेही काम मिळाले तरी करण्यास तयार असल्याचे देखील ते म्हणाले होते.

(Mahabharat Fame Actor Satish Kaul died due to corona)

हेही वाचा :

मुलाचं गाणं ऐकून आईही ढसढसा रडली, म्हणाली, ‘बेटा, हे गाणं पुन्हा गाऊ नकोस!’; मन हेलावणारा किस्सा!

Video | एआर रहमानचा आयडॉल कोण? उत्तर मिळालं, मराठमोळ्या अंजलीसाठी सुखद धक्का

Non Stop LIVE Update
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका
एसटी बँकेच्या संचालकपदाबाबत सदावर्ते दाम्पत्याला मोठा दणका.
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात
दिल्ली गाजवणार मुंडेसाहेबांची लेक, कुठून आली तुतारी..,शिंदेंचा घणाघात.