AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | एआर रहमानचा आयडॉल कोण? उत्तर मिळालं, मराठमोळ्या अंजलीसाठी सुखद धक्का

छोट्या पडद्यावर सध्या ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian idol 12) हा कार्यक्रम धुमाकूळ घालत आहे. या पर्वाने रसिक श्रोत्यांना चांगलीच भुरळ पडली आहे.

Video | एआर रहमानचा आयडॉल कोण? उत्तर मिळालं, मराठमोळ्या अंजलीसाठी सुखद धक्का
ए आर रहमान
| Updated on: Apr 10, 2021 | 3:27 PM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावर सध्या ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian idol 12) हा कार्यक्रम धुमाकूळ घालत आहे. या पर्वाने रसिक श्रोत्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक सरस स्पर्धक सामील झाले आहेत. नुकतीच या स्पर्धेत पाहुणे परीक्षक म्हणून प्रसिद्ध गायक-संगीतकार ए.आर.रहमान (A R Rahman) यांनी उपस्थिती लावली लावली होती. यावेळी त्यांनी या स्पर्धकांसोबत अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत (A R Rahman praised Anjali Gaikwad on the set of Indian Idol 12).

यावेळी त्यांनी आपण मोकळ्या वेळेत मराठमोळी स्पर्धक अंजली गायकवाड हिची गाणी ऐकत असल्याचे म्हटले आहे. इतक्या मोठ्या गायकाकडून आपल्या कलेचे कौतुक ऐकून अंजली गायकवाडचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी ए.आर.रहमान यांनी स्पर्धक गायकांना खास टिप्स देखील दिल्या. स्पर्धेचा सूत्रसंचालक आदित्य नारायण याला कोरोनाची लागण झाल्याने त्याच्या जागी अभिनेता ऋत्विक धनजानी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.

पाहा व्हिडीओ!

शोमध्ये ऋत्विकला ए.आर.रहमान यांना आपल्या मोकळ्या वेळात कोणत्या प्रकारचे संगीत ऐकायला आवडते हे जाणून घ्यायचे होते, ते म्हणाले, ‘जेव्हा जेव्हा मी थकलेलो असतो किंवा आरामात बसलेलो असतो तेव्हा मी अंजली आणि तिची बहीण नंदिनीची शास्त्रीय गाणी ऐकतो. मी त्यांची गाणी सोशल मीडियावर ऐकली आहेत. आणि तिने माझ्या ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’ या चित्रपटात प्लेबॅकदेखील दिला आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘मी या दोघींनाही भविष्यासाठी शुभेच्छा देतो.’(A R Rahman praised Anjali Gaikwad on the set of Indian Idol 12)

कोण आहेत रहमान यांचे आयडॉल?

या प्रश्नावर रहमान म्हणाले की, माझे आयडॉल सतत बदलत असतात. पण सुरुवातीपासूनच मायकल जॅक्सन आणि नुसरत फतेह आली खान हे माझे आयडॉल आहेत. मला शास्त्रीय संगीत ऐकणे खूप आवडते. म्हणून फावल्या वेळेत मी त्याचा आनंद घेतो.

यापेक्षा मोठा आनंद नाही! : अंजली गायकवाड

यावर प्रतिक्रिया देताना गायक अंजली म्हणाली, ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स या चित्रपटासाठी एआर अमीन (ए.आर. रहमान यांचा मुलगा) यांच्यासह ‘मर्द मराठा’सारखे गाणे गाण्याचा मान मिळाला. संगीत विश्वाचे देव स्वत: इथे आले आहेत हे पाहून आम्हाला फार आनंद झाला आहे. या सेटवर आणि अशा मोठ्या मंचावर माझे कौतुक करत आहेत. मला खूप आनंद होत आहे. त्यांनी मला प्रोत्साहित केले आहे आणि यामुळेच मला माझ्या गायनाच्या कारकीर्दीत कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. ए.आर. रहमान आपल्या ’99’ चित्रपटाच्या गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी ‘इंडियन आयडल’ च्या सेटवर आले होते.

(A R Rahman praised Anjali Gaikwad on the set of Indian Idol 12)

हेही वाचा :

PHOTO | आलिया भट्ट नव्हे रणबीर कपूरच्या घरातल्या ‘आलिया कपूर’ची चर्चा, पाहा कोण आहे ‘ही’ व्यक्ती…

कोरोनामुळे गर्भवती महिला पत्रकाराचा मृत्यू, धक्क्याने वडीलही कोमात, बॉलिवूडकरांनी दिला मदतीचा हात!

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.