Sushant Video : ‘एमएस धोनी’ चित्रपटाच्या तयारीदरम्यान कॅप्टन कूलला त्रास द्यायचा सुशांत, पाहा व्हिडीओ

एमएस धोनीच्या बायोपिकमध्ये सुशांत धोनीच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाच्या तयारी दरम्यान त्यानं कॅप्टन कूलला खूप त्रास दिला होता. एमएस धोनीच्या प्रमोशन दरम्यान कॅप्टन कूलनं सुशांतबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. (Sushant used to ask a lot of questions to Captain Cool Mahendra Singh Dhoni, during 'MS Dhoni' movie preparation, watch video)

Sushant Video : 'एमएस धोनी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान कॅप्टन कूलला त्रास द्यायचा सुशांत, पाहा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 3:16 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आता या जगात नाहीये, मात्र त्याचे चाहते त्याला अजूनही विसरलेले नाहीत. सुशांतच्या आठवणीत ते त्याचे जुने व्हिडीओ आणि फोटो (Sushant’s Pictures and videos) शेअर करत असतात. क्रिकेटपटू एमएस धोनीची (MS Dhoni) बायोपिक सुशांतनं केली. ज्यामध्ये तो धोनीच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाच्या तयारी दरम्यान त्यानं कॅप्टन कूलला खूप त्रास दिला होता.

‘एमएस धोनी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. सुशांतनं या चित्रपटाच्या माध्यमातून सर्वांची मनं जिंकली. एमएस धोनीच्या बायोपिकसाठी सुशांतनं खूप मेहनत घेतली. धोनीसारखं खेळण्यापासून त्याच्या चालण्यापर्यंत, बोलण्याच्या स्टाईलपर्यंत सर्व काही तो शिकला होता. मात्र, या काळात तो कॅप्टन कूलला बरेच प्रश्न विचारायचा. यामुळे धोनी खूप अस्वस्थ व्हायचा.

अनेक प्रश्न विचारायचा सुशांत

एमएस धोनीच्या प्रमोशन दरम्यान कॅप्टन कूलनं सुशांतबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. सुशांतला विचारण्यात आलं की तुम्ही चित्रपटासाठी कशी तयारी केली? त्यावेळी सुशांत हसला आणि म्हणाला की मी पहिल्यांदाच MS ला त्याचे पेशन्सं कमी  करताना पाहिलं. सुशांत सांगतो की, जेव्हा मी आधी २-३ दिवस त्याच्यासोबत होतो, तेव्हा मी त्याला खूप प्रश्न विचारायचो. तो सर्व प्रश्नांची उत्तरं तो अतिशय शांतपणे देत होता. मात्र एकदा तो म्हणाला की तुम्ही लोक खूप प्रश्न विचारता, मी थोड्या वेळाने येईन.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओत सुशांत पुढे म्हणतो की मी एकच प्रश्न वेगवेगळ्या प्रकारे विचारायचो… तेव्हाच एमएस म्हणतो की मी तुम्हाला सांगतो, आधी हा थेट एक प्रश्न विचारायचा, नंतर उजवीकडून आणि नंतर डावीकडून. जर उत्तर सेम आलं तर ते हे खरं आहे. मग दुसऱ्या प्रश्नाकडे. तो म्हणतो की स्वतःबद्दल बोलणं खूप विचित्र आहे. जेव्हा 15 मिनिटे व्हायचे आणि माझं काम पूर्ण व्हायचं, तेव्हा मी म्हणायचो की मला विश्रांतीची गरज आहे, मी निघतो.

एमएस धोनी या चित्रपटात सुशांतसोबत दिशा पटानी आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटानंतर सुशांतला खूप प्रेम मिळालं. सर्वांनी त्याचं खूप कौतुक केलं होतं.

संबंधित बातम्या

Ananya Panday : अनन्या पांडेचा ग्लॅमरस लूक, ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर

Shah Rukh Bodyguard : डॉक्टर-इंजीनिअरपेक्षाही शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी सिंहचा पगार बक्कळ, रक्कम ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Pathan : ‘पठान’च्या गाण्याच्या शूटिंगसाठी शाहरुख-दीपिका जाणार स्पेनला, जाणून घ्या आणखी काय खास

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.