The Archies: बॉलिवूडमधील 3 स्टारकिड्सचं एकाच चित्रपटातून पदार्पण; सुहाना, खुशी, अगस्त्यच्या ‘द आर्चीस’चा टीझर पाहिलात का?

चित्रपटसृष्टीतील तीन स्टारकिड्स यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याने या चित्रपटाची सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे. या टीझरवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

The Archies: बॉलिवूडमधील 3 स्टारकिड्सचं एकाच चित्रपटातून पदार्पण; सुहाना, खुशी, अगस्त्यच्या द आर्चीसचा टीझर पाहिलात का?
The Archies
Image Credit source: Facebook
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 3:52 PM

झोया अख्तरच्या (Zoya Akhtar) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आर्चीस’ (The Archies) या चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट म्हणजे आर्चीस कॉमिक्समधील पात्रं आणि कथांचं भारतीय रूपांतर आहे. या चित्रपटात प्रेक्षकांनी कलाविश्वातील नवीन पिढी पहायला मिळणार आहे. अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan), श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नात अगस्त्य नंदा हे यातून पदार्पण करत आहेत. पोस्टरमध्ये हे कलाकार 1960 च्या लूकमध्ये पहायला मिळत आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

टीझरच्या व्हिडीओमध्‍ये हे कलाकार एकमेकांसोबत मजामस्ती करताना पहायला मिळत आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये एक गाणं वाजतंय. आर्ची आणि त्याच्या मित्रमैत्रिणी यांच्यातील खास मैत्री त्यातून दर्शविण्यात आली आहे. यामध्ये अगस्त्य हा आर्चीची भूमिका साकारणार आहे. तर खुशी बेट्टीच्या भूमिकेत आहे. सुहाना खान ही वरोनिकाची भूमिका साकारणार आहे. यासोबतच चित्रपटात डॉट, मिहिर अहुजा, वेदांग रैना आणि युवराज मेंदा यांच्याही भूमिका आहेत.

पहा टीझर-

चित्रपटसृष्टीतील तीन स्टारकिड्स यातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याने या चित्रपटाची सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे. या टीझरवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झोयाने या चित्रपटाची घोषणा केली होती. झोयाच्या ‘दिल धडकने दो’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘गली बॉय’ या चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.