Bhediya box office collection | ‘वरुण धवन’च्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी केला बाॅक्स ऑफिसवर धमाका

गेल्या आठवड्यात अजय देवगणचा दृश्यम 2 हा चित्रपट रिलीज झालाय.

Bhediya box office collection | वरुण धवनच्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी केला बाॅक्स ऑफिसवर धमाका
| Updated on: Nov 27, 2022 | 3:30 PM

मुंबई : वरुण धवन आणि क्रिती सेनॉन यांचा भेडिया हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. पहिल्या दिवशी चित्रपटाची सुरूवात तशी खास झाली नाही. परंतू दुसऱ्या दिवशी चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर जबरदस्त अशी कमाई केलीये. गेल्या आठवड्यात अजय देवगणचा दृश्यम 2 हा चित्रपट रिलीज झालाय. मात्र, आठ दिवस होऊनही प्रेक्षकांचा दृश्यम 2 ला चांगला प्रतिसाद मिळतोय. याचा फटका हा भेडिया चित्रपटाला बसत आहे. पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी भेडिया चित्रपटाने जास्त कमाई बाॅक्स ऑफिसवर केली आहे.

कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर धमाका करू शकत नव्हते. मात्र, अजय देवगणच्या दृश्यम 2 या चित्रपटाने चांगली कमाई केलीये. आता भेडिया हा चित्रपट देखील धमाका नक्कीच करतोय.

भेडियाने पहिल्या दिवशी जगभरात 12.06 कोटी कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी जगभरात 14.60 कोटींची कमाई करत चित्रपटाने एकून 26.66 कोटींची कमाई केली आहे.

ज्याप्रकारे गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जात आहेत. त्या तुलनेत भेडिया हा चित्रपट चांगली कमाई करतोय. कतरिना कैफचा फोन भूत हा चित्रपट तर बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेला.

रविवारी बाॅक्स ऑफिस कलेक्शनवर भेडिया हा चित्रपट धमाका करेल असे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर दृश्यम 2 च्या बाॅक्स ऑफिस कलेक्शनमध्ये देखील वाढ होण्याची दाट शक्यता आहे.