Video : हृतिक रोशन आणि सबा आझाद विमानतळावर स्पॉट, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा पारा चढला!

हृतिक आणि सबा एकमेंकांचा हात धरून विमानतळाबाहेर आला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन्ही स्टार्सचा हात धरतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, विमानतळावरील दोघांचा कॅज्युअल लूकही पाहण्यासारखा आहे. हृतिक आणि सबा यांना एकत्र पाहून चाहते आनंदी आहेत.

Video : हृतिक रोशन आणि सबा आझाद विमानतळावर स्पॉट, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा पारा चढला!
| Updated on: Jul 24, 2022 | 2:45 PM

मुंबई : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद सध्या चर्चेत आहेत. नुकताच मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) हृतिक आणि सबाला पाहून पापाराझींनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. विमानतळावरून बाहेर पडताना सबा आझादची नजर तिचा प्रिय हृतिक रोशनवरच होती. ती हृतिककडे प्रेमाने पाहत होती. सध्या सोशल मीडियावर हृतिक रोशन आणि सबा आझादचा हा विमानतळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. हृतिक रोशन आणि सबा आझाद विमानतळावर हातात हात घालून मस्त चालताना दिसत आहेत.

इथे पाहा हृतिक आणि सबाचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हात धरलेला व्हिडिओ व्हायरल

हृतिक आणि सबा एकमेंकांचा हात धरून विमानतळाबाहेर आला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दोन्ही स्टार्सचा हात धरतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, विमानतळावरील दोघांचा कॅज्युअल लूकही पाहण्यासारखा आहे. हृतिक आणि सबा यांना एकत्र पाहून चाहते आनंदी आहेत, मात्र, काहीजण त्यांना ट्रोल देखील करताना दिसत आहेत. एका यूजरने लिहिले की, मला वाटले की ती त्याची मुलगी आहे. दुसर्‍या युजरने लिहिले की, त्याने लहान मुलासारखा सबाचा हात धरला आहे.

दोघे लग्न करणार असल्याची देखील चर्चा सुरू

हृतिक रोशन 48 वर्षांचा आहे, तर सबा आझाद त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. यामुळेच हृतिकची सबा आझादसोबतची रोमँटिक केमिस्ट्री पाहून काही लोक त्यांना सातत्याने ट्रोल करताना दिसतात. हृतिक रोशन आणि सबा आझाद या दोघांना सर्वांत पहिल्यांदा एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना पापाराझींनी पाहिलं. रेस्टॉरंटमधून बाहेर येताना हृतिकच्या हातात सबाचा हात होता. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. हे दोघे लग्न करणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे.