
मुंबई : बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे सलमान खान (Salman Khan) या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही दिसला. बिग बाॅस फेम शहनाज गिल आणि पलक तिवारी यांनी या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. मात्र, म्हणावी तेवढी खास ओपनिंग किसी का भाई किसी की जान चित्रपटाची ठरली नाही. अनेकांनी या चित्रपटाला ओपनिंग डेचा फायदा होईल, असे म्हटले होते. विशेष म्हणजे शनिवारी चित्रपटाचा (Movie) जलवा बघायला मिळाला.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत पूजा हेगडे ही मुख्य भूमिकेत आहे. सतत एक चर्चा रंगत होती की, सलमान खान हा पूजा हेगडे हिला डेट करत आहे. कारण चक्क पूजा हेगडे हिच्या भावाच्या लग्नामध्ये सलमान खान याने हजेरी लावली. मात्र, या चर्चांवर काही दिवसांपूर्वीच पूजा हेगडे हिने सडेतोड उत्तर देखील दिले आहे.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे दोन दिवसांचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन पुढे आले आहे. चित्रपटाला रिलीज होऊन आज तीन दिवस होत आहेत. एका रिपोर्टनुसार तिसऱ्या दिवशी किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 27 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन करेल, असे सांगितले जात आहे. म्हणजेच विकेंड सलमान खान याच्या चित्रपटासाठी लकी ठरण्याची दाट शकता आहे.
सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाने ओपनिंग डेला 15.81 कोटी, दुसऱ्या दिवशी 25.75 कोटींची कमाई केलीये. आता असा अंदाजा आहे की, तिसऱ्या दिवशी चित्रपट 27 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन करेल. सलमान खान याच्या या चित्रपटातून निर्मात्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. अजून पुढचे काही दिवस चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
सलमान खान याने या चित्रपटासाठी 50 कोटी फिस घेतली आहे. पूजा हेगडे हिने 6 कोटी घेतले आहे. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा बिग बजेटचा चित्रपट आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरूख खान याचा रिलीज झालेल्या पठाण चित्रपटामध्ये सलमान खान याची एक झलक चाहत्यांना बघायला मिळाली होती. ज्यावेळी पठाण हा अडचणीमध्ये होता, त्यावेळी सलमान त्याच्या मदतीला धावून गेल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले.