Tiger 3 | टायगर 3 चित्रपटात ही टीव्ही अभिनेत्री महत्वाच्या भूमिकेत दिसणार

सर्वांची आवडती जोडी सलमान खान आणि कतरिना कैफ या चित्रपटात दिसणार आहेत. भारतासह दुबईमध्ये या चित्रपटाची शूटिंग झालीये.

Tiger 3 | टायगर 3 चित्रपटात ही टीव्ही अभिनेत्री महत्वाच्या भूमिकेत दिसणार
| Updated on: Nov 04, 2022 | 7:29 AM

मुंबई : सलमान खान याच्या टायगर 3 चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा होत आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल प्रचंड क्रेझ बघायला मिळते. सर्वांची आवडती जोडी सलमान खान आणि कतरिना कैफ या चित्रपटात दिसणार आहेत. भारतासह दुबईमध्ये या चित्रपटाची शूटिंग झालीये. मात्र, सलमान खान आणि कतरिना कैफ व्यतिरिक्त चित्रपटाची स्टारकास्ट कळू शकली नव्हती. रिपोर्टनुसार टायगर 3 चित्रपटात एक टीव्ही अभिनेत्री महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही टीव्ही अभिनेत्री नेमकी कोण जिला चक्क सलमानच्या टायगर 3 मध्ये काम करण्याची संधी मिळाली, याची चर्चा आता होताना दिसत आहे.

सलमान खानचा चित्रपट कोणताही असो तो बाॅक्स आॅफिसवर हीट ठरतो म्हणजे ठरतोच. बाॅलिवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्रीचे सलमान खानसोबत काम करण्याचे स्वप्न असते. जो कोणी सलमान खानच्या चित्रपटात काम करतो, त्याचे नशिबच बदलून जाते. आता टायगर 3 चित्रपटात एका टीव्ही अभिनेत्रीला सलमान खानने संधी दिली.

ही टीव्ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रिद्धी डोगरा आहे. टायगर 3 चित्रपटात रिद्धी डोगरा महत्वाच्या भूमिकेत आहे. हळूहळू टायगर 3 ची स्टारकास्ट पुढे येत असून यामध्ये रिद्धी डोगराचे नाव आहे. रिद्धीची भूमिका छोटी असली तरी ती खूप महत्त्वाची आणि दमदार असेल. आतापर्यंत रिद्धीने अनेक हीट मालिकांमध्ये काम केले आहे. यापूर्वीही रिद्धी डोगराने एका चित्रपटात काम केले आहे.