AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varun Dhawan | ‘वरुण धवन’चे पहिले क्रश आणि पहिला पगार नेमका किती?, जाणून घ्या

आता वरुण धवनचा भेडिया काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Varun Dhawan | 'वरुण धवन'चे पहिले क्रश आणि पहिला पगार नेमका किती?, जाणून घ्या
| Updated on: Nov 24, 2022 | 4:31 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन त्याच्या भेडिया या चित्रपटामुळे चर्चेत आहे. क्रिती सेनन आणि वरुण धवन सध्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात बिझी आहेत. हा चित्रपट 25 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करू शकत नसताना अजय देवगणचा चित्रपट जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय. आता वरुण धवनचा भेडिया काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

वरुण धवनने चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आपल्या खासगी आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टींवर मोठा खुलासा केला आहे. यामध्ये चक्क वरुण धवन याने आपले पहिले क्रश कोण होते आणि आपली पहिली पगार नेमकी किती होती, यावर मोठा खुलासा केला आहे.

तुम्हाला ऐकून नक्कीच धक्का बसेल. परंतू स्वत: वरुण धवन याने सांगितले की, त्याची पहिली क्रश ही दुसरी तिसरी कोणी नसून सानिया मिर्झा ही होती. सानियाचा खूप जास्त मोठा फॅन हा वरुण धवन होता.

आपल्या पहिल्या क्रशसोबतच वरुण धवन याने आपली पहिली पगार किती होती, यावर ही भाष्य केले आहे. तुम्हाला जाणून आर्श्चय वाटेल, परंतू हे खरे आहे की, वरुणची पहिली पगार ही 5000 रूपये होती.

पुढे वरुण धवन म्हणाला की, सानिया मिर्झाला भेटण्याची माझी खूप अगोदरपासून इच्छा होती. परंतू आमची पहिली भेट ही फार जास्त खास आणि चांगलीच नक्कीच झाली नाहीये.

आम्ही एका जाहिरातीच्या शूट वेळी पहिल्यांदा भेटलो. यावेळी मला सानियाने येताना अ‍ॅपल आणायला सांगितले होते. मग मी घेऊन गेलो. परंतू यावेळी मी खूप जास्त घाबरलेला होतो. सानियाला काय बोलायचे काय नाही हे सर्व विचार माझ्या मनात सुरू होते.

मी सानियाने सांगितल्याप्रमाणे अ‍ॅपल घेऊन गेला होतो. परंतू तिला ते देण्याची माझी हिंम्मतच होत नव्हती. मग तिथे सानियाची आई होती आणि मग मी हे घाबरत घाबरत त्यांना देण्याचा प्रयत्न केला.

मी अ‍ॅपल सानियाच्या आईला देत असताना त्यांनी सांगितले की, सानिया अ‍ॅपल खात नाही आणि तिला ते आवडत देखील नाहीत. तुला हे कोणी आणायला सांगितले? असे म्हणत त्या मला ओरडल्या. परंतू तेवढ्यात तिथे सानिया आली आणि तिने हा सर्व विषय व्यवस्थित हाताळला.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...