AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Varsha Usgaonkar : ते फटकळ स्वभावाचे होते, त्याचा अनुभव मलाही…नाना पाटेकर यांच्याबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?

अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज त्यांच्या शोक सभेचे मुंबईत आयोजन करण्यात आले. या सभेला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. अभिनेत्री वर्षा उसगांवकर ह्या सुद्धा नानांच्या शोकसभेसाठी उपस्थित राहिल्या. नानांच्या शोकसभेत वर्षा उसगांवकर यांनी चित्रपट आणि चित्रपटाच्या शुटिंगचे काही आठवणीत राहतील असे किस्से सांगितले, वर्ष उसगावकर म्हणाल्या, “कलाकार अनेक होतात, पण अशा भूमिका साकारणं प्रत्येकाला शक्य नाही,” अशा शब्दांत त्यांनी नाना पाटेकर यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. ‘तिरंगा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे अनेक किस्से सांगताना त्या भावुक झाल्या.

Varsha Usgaonkar : ते फटकळ स्वभावाचे होते, त्याचा अनुभव मलाही...नाना पाटेकर यांच्याबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर?
varsha usgaonkar
| Updated on: Oct 14, 2026 | 8:19 PM
Share

अभिनेते नाना पाटेकर यांचे ८ ऑक्टोबर २०२६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज त्यांच्या शोक सभेचे मुंबईत आयोजन करण्यात आले. या सभेला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेकांनी त्यांना आठवणींतून श्रद्धांजली केली. प्रार्थना सभेला उपस्थित कलाकारांनीही दिवंगत अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अभिनेत्री वर्षा उसगांवकर ह्या सुद्धा नानांच्या शोकसभेसाठी उपस्थित राहिल्या. नानांच्या शोकसभेत वर्षा उसगांवकर यांनी चित्रपट आणि चित्रपटाच्या शुटिंगचे काही आठवणीत राहतील असे किस्से सांगितले, वर्ष उसगावकर म्हणाल्या, “कलाकार अनेक होतात, पण अशा भूमिका साकारणं प्रत्येकाला शक्य नाही,” अशा शब्दांत त्यांनी नाना पाटेकर यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. ‘तिरंगा’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे अनेक किस्से सांगताना त्या भावुक झाल्या.

म्हणाल्या की, नाना पाटेकर यांच्यासोबत काम करणार असल्याचं मला बराच काळानंतर समजलं होतं. त्यांच्यासारख्या मोठ्या कलाकारासमोर काय बोलावं, असा प्रश्न मला पडला होता. चित्रपटातील पहिल्या सीनच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी संपूर्ण सीन शूट केला होता. त्यावेळी त्या वारंवार मेहुलजींकडे पाहत होत्या, कारण नेमकं दिग्दर्शन कोण करत आहे, हे त्यांना समजत नव्हतं.

नाना पाटेकर फटकळ स्वभावाचे होते आणि त्याचा अनुभव मलाही आला होता, असंही वर्षा उसगांवकर यांनी सांगितलं. एका पत्रकाराने मुलाखतीसाठी विचारल्यानंतर त्यांनी लगेच होकार दिला, तेव्हा नाना पाटेकर यांनी “काय गं, इतक्या लवकर हो म्हणालीस? स्वतःला महाग कर गं,” असं म्हटलं होतं. त्यामुळे मी ती मुलाखत लपूनछपून दिली होती.

तसंच, “लग्न कर गं,” असं नाना पाटेकर एकदा म्हणाले होते. त्यांच्या बोलण्याचा सुरुवातीला राग आला, मात्र नंतर त्यांनी “माझं बोलणं मनावर घेऊ नको,” असंही सांगितल्याची आठवण वर्षा उसगांवकर यांनी सांगितली.

‘तिरंगा’नंतर नाना पाटेकर यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली नाही, याची खंत व्यक्त करत त्या म्हणाल्या की, एवढ्या मोठ्या कलाकारासोबत काम करण्याचं भाग्य मिळालं, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप