सेजल पवारनंतर पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर ऐश्वर्याचा जुना जोक… नव्या वादाला फोडणी

डॉ. सेजल पवारच्या प्रायव्हेट पार्टवरील विनोदानंतर सुरू झालेल्या वादाला आता ऐश्वर्या मोहनराजच्या जुन्या व्हिडिओमुळे आणखी फोडणी मिळाली आहे. कॉमेडीच्या नावाखाली असे विनोद योग्य आहेत का, यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

सेजल पवारनंतर पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर ऐश्वर्याचा जुना जोक... नव्या वादाला फोडणी
Aishwarya Mohanraj
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 16, 2026 | 11:03 PM

स्टँड अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शोमध्ये डॉ. सेजल पवारने मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरून जोक केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. डॉ. पवारची मानसिकता विकृत असल्याचं सांगत तिचा निषेधही करण्यात येत होता. सेजल आणि प्रणित विरोधात तक्रार दाखल झाली असून त्यांची चौकशी करण्यासाठी केईएम रुग्णालयाने समितीही स्थापन केली आहे. हा वाद सुरू असतानाच कॉमेडियन ऐश्वर्या मोहनराज हिचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतही तिने प्रायव्हेट पार्टवरून जोक केला असून आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

हा व्हिडिओ कॉमिकस्तान शोचा आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्स कॉमेडीच्या विश्वातील सिलेक्टिव्ह आऊटरेजवर सवाल करताना दिसत आहे. अनेक कॉमेडियन आपल्या जुन्या जोक्सवरून टीकेचे धनी झालेले असतानाच ऐश्वर्या मोहनराज हिचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

काय म्हणाली?

या व्हिडिओत ऐश्वर्या तिच्या लहान भावाचा जन्म आणि आईच्या प्रतिक्रियेवरून जोक करताना दिसत आहे. ती म्हणते, जेव्हा माझा भाऊ जन्माला आला, तेव्हा माझी आई खूप रडली होती. माझ्या आईला त्याचा प्रायव्हेट पार्ट कापायचा होता. पण निर्लज्ज नर्सने तिला असं करू दिलं नाही. पण एक महिला म्हणून मी तिचं स्वप्न पूर्ण करेन. जेव्हा माझा मुलगा होईल तेव्हा मी त्याचा प्रायव्हेट पार्ट नक्कीच कापून टाकेन.

 

सोशल मीडियात प्रतिक्रिया

हा व्हिडिओ आल्यानंतर सोशल मीडियातून प्रतिक्रिया उमटत आहे. अनेक यूजर्सने या प्रकाराची तुलना आताच्या वादाशी केली आहे. जर आजच्या जोक्सवर टीका केली जात असेल तर अशाच प्रकारच्या जुन्या जोक्सवरही लक्ष दिलं पाहिजे, असं काहींचं म्हणणं आहे. तर काहींच्या मते, ऐश्वर्याचा जोक्स अत्यंत आक्षेपार्ह आहे. अशा प्रकारची विधानं कॉमेडी किंवा व्यंगाच्या नावाखाली योग्य ठरवता येणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कॉमेडियन प्रणित मोरे एका सोशल मीडिया वादात अडकला आहे. ऑडियन्समध्ये बसलेल्या हिमांशू जांगडाच्या 370 रुपयेवाल्या बिर्याणीशी हे प्रकरण संबंधित आहे. हा वाद सुरू असतानाच आता ऐश्वर्याचा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्याने वादाला फोडणी बसली आहे.

Follow Us