मुंबईला सोडून मनालीला का जात आहे सलमान खान ?
बॉलीवूडचा स्टार सलमान खान आता मनालीला चालला आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला असेल की सलमान सुट्टी साजरी करण्यासाठी तर मनालीला जात नसेल ना, परंतू खरे कारण वेगळेच आहे.

बॉलीवूडचा स्टार सलमान खान याच्या बाबतीत चाहत्यांचे इतके प्रेम आहे की चाहते त्याच्या चित्रपटाची आवर्जून वाट पाहातात. सलमान खान कोणत्या चित्रपटाचे शुटींग करत आहे.किंवा त्याची संस्था’बीइंग ह्यूमन’ (Being Human) बाबतही चाहते लक्ष ठेवून असतात. त्याचे वांद्रे येथील घर देखील चाहत्यांचे आवडते ठिकाण आहे. मात्र आता अशी बातमी आली आहे की सलमान मुंबई सोडून मनालीला जात आहे. काय आहे नेमके सलमान याच्या मनात पाहूयात…
वास्तविक सलमान दिग्दर्शक वामशी पेडिपल्ली याच्या सोबत एक एक्शन-ड्रामा चित्रपट करत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत १८ एप्रिल पासून सुरु झाले होते. आता या पिक्चरचे मुंबईत शुटींग शेड्युल संपले आहे. आता एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार या चित्रपटाचे उर्वरित शुटींग आता मनाली येथे होत आहे. त्यामुळे संपूर्ण चित्रपटाची टीम आता मनालीला रवाना होत आहे. मात्र, मनालीत शुटींग नेमकी केव्हा सुरु होणार या संदर्भात काही माहिती मिळालेली नाही. लवकरच मनालीत हे चित्रीकरण सुरु होणार असल्याचे म्हटले जात आहे.
पुढच्या वर्षी ईदवर रिलीज होणार
बातमीनुसार सलमान खान याच्या या चित्रपटाचे नाव ‘द मॅसेंजर्स’ असे असणार आहे. मात्र, अजून अधिकृतपणे या चित्रपटाचे नाव घोषीत केलेले नाही. त्यामुळे या चित्रपटाला SVC63 म्हटले जात आहे. या चित्रपटाचा मोठ्या स्वरुपात खर्च केला जात आहे. या सलमान किंवा मेकर्स देखील कोणतीही कसूर सोडणार नाहीत असे म्हटले जात आहे. ईद २०२७ ला हा चित्रपट रिलीज केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
सलमान सोबत असेल नयनतारा
सलमान खान सोबत या चित्रपटात अभिनेत्री नयनतारा असणार आहे. ती देखील मुंबईतील शुटींग शेड्युलचा भाग होती. नयनतारा हे साऊथचे मोठे नाव आहे. हा तिचा दुसरा बॉलीवूड चित्रपट आहे. या आधी तिने शाहरुख खान सोबत ‘जवान’ चित्रपटात काम केले होते. तिचे काम चाहत्यांना प्रचंड आवडले होते. आता रिलीज नंतर सलमान आणि नयनतारा यांची जोडी हिट होते का हा येणारा काळच सांगेल…