AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saawan Kumar Tak | प्रसिद्ध लेखक आणि निर्माते सावन कुमार टाक रुग्णालयात दाखल, प्रकृती चिंताजनक

सावन कुमार यांनी आपल्या करिअरमध्ये मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. निर्माता म्हणून त्यांनी नौनिहाल हा पहिला चित्रपट बनवला. या चित्रपटात संजीव कुमार मुख्य भूमिकेत होते. त्याच वेळी, दिग्दर्शक म्हणून त्यांनी मीना कुमारीला त्यांच्या चित्रपटासाठी कास्ट केले.

Saawan Kumar Tak | प्रसिद्ध लेखक आणि निर्माते सावन कुमार टाक रुग्णालयात दाखल, प्रकृती चिंताजनक
| Edited By: | Updated on: Aug 25, 2022 | 10:44 AM
Share

मुंबई : प्रसिद्ध लेखक आणि निर्माते सावन कुमार टाक (Saawan Kumar Tak) यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सावन कुमार टाक यांच्यावर मुंबईतील अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात सध्या उपचार (Treatment) सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून सावन कुमार टाक यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यात. टाक यांनी सलमान खानसह अनेक बड्या बॉलिवूड (Bollywood) कलाकारांसोबत काम केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून सावन कुमार टाक हे फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज देत आहेत.

सावन कुमार टाक आयसीयूमध्ये दाखल

सावन कुमार टाक यांना रूग्णालयात दाखल केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. काही दिवसांपूर्वीही त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सावन कुमार टाक हे आयसीयूमध्ये असून त्यांचे हृदय व्यवस्थित काम करत नाहीये. याशिवाय त्यांना इतरही आजार झाल्याची माहिती मिळते आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.

हृदय व्यवस्थित काम करत नसल्याने सावन कुमार यांना रूग्णालयात केले दाखल

सावन कुमार यांनी आपल्या करिअरमध्ये मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. निर्माता म्हणून त्यांनी नौनिहाल हा पहिला चित्रपट बनवला. या चित्रपटात संजीव कुमार मुख्य भूमिकेत होते. त्याच वेळी, दिग्दर्शक म्हणून त्यांनी मीना कुमारीला त्यांच्या चित्रपटासाठी कास्ट केले. दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट गोमती के किनरे हा 1972 साली आला होता. सावन कुमार टाक यांनी संजीव कुमार तसेच मीना कुमारी, राजेश खन्ना, जितेंद्र, श्रीदेवी, जया प्रदा आणि सलमान खान यांसारख्या सर्व मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत