Border 2 Advance Booking : रिलीजपूर्वीच Dhurandhar ला पछाडलं, सनी देओलच्या बॉर्डर 2 ची छप्परफाड कमाई !

Sunny Deol Film Border 2 : अभिनेता सनी देओल सह मल्टीस्टारर असलेला बॉर्डर 2 हा चित्रपट अखेर थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगलाही उत्तम रिस्पॉन्स मिळताना दिसत आहे.

Border 2 Advance Booking : रिलीजपूर्वीच Dhurandhar ला पछाडलं, सनी देओलच्या बॉर्डर 2 ची छप्परफाड कमाई !
बॉर्डर 2
Image Credit source: social media
| Updated on: Jan 23, 2026 | 11:23 AM

Sunny Deol Border 2 Advance Booking : बॉलीवूडचा शक्तिशाली अभिनेता सनी देओल पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे. “बॉर्डर” चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 29 वर्षांनी त्याचा सिक्वेल Border 2  आता थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. शिवाय, बॉर्डर चित्रपटाच्या प्रचंड यशाचा या प्रचाराला फायदा झाला आहे आणि या चित्रपटाबाबात प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अगदी 3 दिवस आधीच हा देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल बोलायचं झाले तर, रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालातान दिसत आहे.

आता या चित्रपटाला मोठी कमाई करण्याची सुवर्णसंधी आहे. हा चित्रपट ज्या दिवशी ( शुक्रवार 23 जानेवारी) प्रदर्शित होतोय, सुमारास इतर कोणतेही मोठे चित्रपट प्रदर्शित होणार नाहीयेत आणि प्रजासत्ताक दिन देखील जवळ आला आहे.
त्यामुळे, या चित्रपटाला परफॉर्मन्स करण्यासाठी एक उत्तम स्टेज मिळाला आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाने किती पैसे कमावले आहेत आणि पहिल्या दिवशी तो किती कमाई करू शकतो ते जाणून घेऊया.

ॲडव्हान्स बुकिंगमधून बॉर्डर 2 ने किती केली कमाई ?

बॉर्डर 2 चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने भारतात 16 हजार 221 शोसाठी एकूण 4, 09, 117 तिकिटे विकली आहेत. या चित्रपटाने फक्त ॲडव्हान्स बुकिंगमधून तब्बल 12 .5 कोटी कमावले आहेत. जर ब्लॉक केलेल्या जागांचाही समावेश केला तर, ॲडव्हान्स बुकिंगमधून चित्रपटाने आधीच 17.50 कोटी कमावले आहेत. ओपनिंग डेच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाचा पुढा मार्गही सोपा असू शकतो.

ओपनिंग डे ला किती असेल बॉर्डर 2 चं कलेक्शन?

बॉर्डर 2 बद्दल जितकी चर्चा आहे तितकी अशा चित्रपटांमध्ये क्वचितच पाहायला मिळते. 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या धुरंधरलाही अशी लोकप्रियता मिळाली नाही. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने धुरंधरलाही मागे टाकलं आहे. ॲडव्हान्स बुकिंगद्वारे धुरंधरने 14 कोटी रुपये कमावले, तर बॉर्डर2 ने 17 कोटी रुपयांचा कलेक्शनचा टप्पा ओलांडला आहे. याशिवाय, जर रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, हा चित्रपट पहिल्या दिवशी 45 कोटी ते 50 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. जर असं खरंच झालं तर पहिल्या दिवशीच्या कलेक्शनच्या बाबतीत हा चित्रपट धुरंधरलाही मागे टाकेल. धुरंधरने पहिल्या दिवशी 40 कोटी रुपये कमावले.