Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?

अभिनेता रणबीर कपूरच्या बहुचर्चित ब्रह्मास्त्र ने चांगली कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या पार्ट 2 बद्दल सतत अपडेट्स समोर येत असून रिपोर्ट्सनुसार, चित्रपटात सैयारा स्टारही दिसणार आहे.

Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र 2 मध्ये सैयारा स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
Big Updates on Brahmastra 2 casting
| Updated on: Aug 24, 2026 | 8:53 PM

Brahmastra 2 Casting Update : बॉलीवूडचा चॉकलेट बॉय, हँडसम आणि तितकाच ताकदवान अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याचं फॅनफॉलोईंग खूप मोठं आहे. त्याचे चित्रपट लाखो चाहत्यांना खूप आवडतात. गेल्या 5 वर्षांत त्याचा फक्त 1 चित्रपट फ्लॉप ठरला असून बाकी 4 चित्रपटांनी उत्तम कमाई केली. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ब्रह्मास्त्र (Brahmastra) . या चित्रपटाने 400 कोटींपेक्षा जास्तीची कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. आधीच्या भागाप्रमाणेच हा भागही खूप चांगला गल्ला कमवेल असं बोललं जात आहे. याचदरम्यान चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

ताज्या रिपोर्ट्सनुसार, ब्रह्मास्त्र 2 (Brahmastra 2) मध्ये सैयारा स्टारची एंट्री होऊ शकते. तरूण अभिनेत्री अनित पड्डा ही या चित्रपटात पहायला मिळू शकते. पहिल्याच चित्रपटातून तिचं डेब्यू खूप आश्वासक होतं आणि पाहता पाहता ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली होती. त्यामुळे अनीत आता रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसू शकते.

आलियाव्यतिरिक्त दिसणार आणखी 2 अभिनेत्री

ब्रह्मास्त्रच्या पहिल्या भागात रणबीर कपूरसोबत आलिया भट्ट दिसली होती. मात्र या चित्रपटाच्या दुसऱ्या भागत दीपिका पदुकोण ही देखील अतिशय महत्वाच्या भूमिकेत दिसू शकते अशी चर्चा सुरू झाली होती. तर आता चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल आणखी एक अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, ब्रह्मास्त्र 2 चित्रपटात अनीत पड्डा हिचा समावेश होऊ शकतो. त्यासाठी मेकर्सनी तिला अप्रोच केलंय, असं बोललं जात आहे. मात्र त्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

कधी सुरू होणार ब्रह्मास्त्र 2 चं शूटिंग?

ब्रह्मास्त्रचा पहिला भाग 2022 साली आला होता. बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच व्हीएफएक्स लोडडे चित्रपट चाहत्यांना पहायला मिळाला होता. अयान मुखर्जीने दिग्दर्शिकत केलेला पहिला भाग प्रचंड गाजला, लोकप्रिय ठरला आणि कमाईही उत्तम केली. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट यांच्याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, शाहरुख खान, नागार्जुन आणि मौनी रॉय हे कलाकारही वेगवेगळ्या भूमिकेत दिसले होते. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचं बडेट 350 कोटींच्या आसपास होतं.

Follow Us