शिष्य म्हणून आला, प्रेमात पडला, पळून जाऊन लग्न केलं, गुरुनेही शिकवला धडा…

प्रेमप्रकरणामुळे हा गायक खूपच बदनाम झाला. काही लोकांनी तर प्रेमासाठी मर्यादा ओलांडल्याचं म्हटलं. त्यांचे अफेअर आणि लग्न खूप चर्चेत होते. हा गायक त्यांच्या गझल आणि सुफी संगीतासाठी प्रसिद्ध आहे.

शिष्य म्हणून आला, प्रेमात पडला, पळून जाऊन लग्न केलं, गुरुनेही शिकवला धडा...
ANUP JALOTHA AND HIS WIFE
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jan 20, 2024 | 5:32 PM

नवी दिल्ली | 20 जानेवारी 2024 : आपल्या मखमली आवाजाने लोकांमध्ये त्याने स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले. प्रसिद्ध भारतीय गायकांमध्ये त्याची गणना होते. संगीत दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक म्हणून त्यांनी संगीतविश्वात आपला ठसा उमटवला आहे. त्यांची गाणी ऐकून लोक मंत्रमुग्ध होतात. चित्रपटांसाठी त्यांनी फारसे गाणे गायले नाही. परंतु, शेकडो लाइव्ह कॉन्सर्ट आणि अल्बमद्वारे त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले. गझल गायक होण्यापूर्वी ते एक प्रसिद्ध तबला वादक होते. अनेक दिग्गज गायकांसाठी त्यांनी तबला वाजवला. मोठ्या देशांमध्ये त्यांच्यासोबत स्टेज परफॉर्मन्स दिले. पण, त्यांच्यावर झालेल्या एका आरोपामुळे ते बदनाम झाले. स्वतःच्या गुरु पत्नीसोबत त्यांनी लग्न केले होते.

बदनाम झालेले हे गायक दुसरे कोणी नसून रूपकुमार राठोड आहेत. रूपकुमार राठोड त्यांच्या गझल आणि सुफी संगीतासाठी ओळखले जातात. रूपकुमार राठोड हे उत्तम तबला वाजवत असत. मात्र, त्यांनी गझल शिकण्यासाठी प्रसिद्ध बॉलीवूड भजन गायक अनूप जलोटा यांच्याकडे संगीत शिकवणी लावली.

अनूप जलोटा यांच्या टीममध्ये ते काम करत होते. अनूप यांच्या ताफ्यात रूपकुमार तबला वाजवत असत. गुरू अनूप जलोटा यांच्याकडून संगीतातील बारकावे शिकण्यासोबत रूपकुमार स्वतः शो करत असत. शिकवणीच्या निमित्ताने रूपकुमार हे अनूप जलोटा यांच्या घरी जात असते. येथेच त्यांची ओळख अनूप जलोटा यांची पत्नी सोनाली सेठ हिच्यासोबत झाली. काही काळानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

आणि सोनाली सेठ घरातून पळून गेली.

1984 मध्ये अनूप जलोटा यांना अमेरिकेत एका कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले. अनुप जलोटा यांनी पत्नी सोनालीलाही सोबत येण्यास सांगितले. पण, सोनालीने अमेरिकेला जाण्यास नकार दिला. याचे कारण सोनालीचे रूपकुमार सोबतचे अफेअर होते. दोघेही प्रेमात होते. अनूप जलोटा अमेरिकेला गेले. दुसरीकडे सोनाली हिने रूपकुमार याच्यासाठी घर सोडले.

अनूप जलोटा म्हणाले काम देऊ नका…

अनूप जलोटा यांना याची माहिती मिळताच त्यांनी याचा जोरदार निषेध केला. रूपकुमार यांना इंडस्ट्रीत काम मिळू नये यासाठी अनूप जलोटा अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होते. मात्र, अनूप यांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले. रुपकुमार आणि सोनाली यांनी आपले प्रेम जवळपास 4 वर्षे लपवून ठेवले. मात्र, त्यांच्या अफेअरच्या बातम्या येत राहिल्या. अखेर, 1989 साली रूपकुमार राठोड आणि सोनाली सेठ यांनी विवाह केला.

श्रवणच्या नात्यामुळे काम मिळाले…

त्याकाळी नदीम-श्रवण ही जोडी चांगलीच चर्चेत होती. यातील श्रवण हा रूपकुमार यांचा मोठा भाऊ. तर, पार्श्वगायक विनोद राठोड ही त्यांचा दुसरा भाऊ. अनूप जलोटा यांनी रुपकुमार यांना इंडस्ट्रीतून हद्दपार करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण, रुपकुमार यांचा स्वतःच्या गायनामुळे लोकांच्या मनावर राज्य केले. रूपकुमार यांनी आपल्या भावांकडे कधी मदत मागितली नाही पण, त्यांच्या नात्यामुळेच रुपकुमार यांना कामे मिळत होती हे ही तितकेच खरे…