AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor | ‘करीनामुळे त्याने प्राण गमावले असते…’, बेबोबद्दल मोठं सत्य समोर

Kareena Kapoor | 'त्या' व्यक्तीने घटनेनंतर गमावले असते स्वतःचे प्राण... अभिनेत्री करीना कपूर हिच्याबद्दल काय म्हणला अभिनेता? सध्या सर्वत्र 'जानेजान' सिनेमाच्या सेटवर घडलेली घटना अखेर समोर... नक्की काय झालं होतं? सध्या सर्वत्र करीना कपूर हिचीच चर्चा...

Kareena Kapoor | 'करीनामुळे त्याने प्राण गमावले असते...', बेबोबद्दल मोठं सत्य समोर
| Updated on: Sep 22, 2023 | 9:46 AM
Share

मुंबई : 22 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री करीना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही करीना हिची लोकप्रियता कमी झालेली नाही. बॉलिवूडच्या अनेक जुन्या परंपरा करीना कपूर हिने मोडून काढल्या आहेत. आजही करीना सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज असते. सध्या सर्वत्र करीना हिच्या ‘जानेजान’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमा २१ सप्टेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमात करीना हिच्यासोबत अभिनेता विजय वर्मा आणि अभिनेता जयदीप अहलावत यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. आता जयदीप याने अभिनेत्रीबद्दल मोठं सत्य सांगितलं आहे. ज्यामुळे करीना पुन्हा चर्चेत आली आहे.

जयदीप याने सेटवर घडलेल्या एका धक्कादायक घटनेबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे. जयदीप म्हणाला, ‘ सिनेमाच्या सेटवर प्रत्येक जण करीना हिच्या सौंदर्यावर घायाळ होता.. एक सीन होता ज्यामध्ये मला दरवाजा उघडायचा होता आणि दुसऱ्या बाजूला करीना उभी होती. कॅमेरा टीम मला तिच्या जवळ नेण्याच्या प्रयत्नात होते…’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘एका कॅमेरा ऑपरेटर त्याठिकाणी उभा होता आणि त्याच्या खांद्यावर कॅमेरा होता… तेव्हा सुजॉय यांनी ऍक्शन म्हणताच दरवाजा उघडला आणि कॅमेरा ऑपरेटर जमीनीवर पडला… मी तेव्हा दिवसभर कॅमेरा ऑपरेटरची खिल्ली उडवली ‘तुला काय वाटतं तिच्या डोळ्यांमध्ये पाहणं इतकं सोपं आहे का?’ असं म्हणत मी कॅमेरा ऑपरेटरला चिडवत होतो..’

सिनेमाचे दिग्दर्शक सुजॉय घोष म्हणाले, ‘तेव्हा कॅमेरा ऑपरेटरचे प्राण धोक्यात होते. त्याला काही झालं असतं तर, दुसऱ्या कॅमेरा ऑपरेटरला शोधावं लागलं असतं आणि त्यासाठी माझ्याकडे बजेट नव्हता..’ नुकताच झालेल्या मुलाखतीत जयदीप अहलावत आणि सुजॉय घोष यांनी विनोदी अंदाजात अनेक गोष्टी सांगितल्या. सध्या सर्वत्र करीना कपूर आणि अभिनेत्रीचा सिनेमा ‘जानेजान’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.

करीना हिचे आगामी सिनेमे

‘जानेजान’ सिनेमानंतर करीना कपूर ‘द बकिंघम मर्डर्स’ सिनेमात दिसणार आहे. त्यानंतर अभिनेत्री ‘द क्रू’ सिनेमात देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात करीना हिच्यासोबत तब्ब आणि क्रिती सनॉन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय ‘लूटकेस’ सिनेमातून देखील करीना चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.