सिंगल मदर असलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा 23 वर्षांनी लहान मुलासोबत ‘वन नाईट स्टँड’; म्हणाली ‘छान वाटलं, फारच खास…’
सिंगल मदर असलेल्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने 23 वर्षांनी लहान मुलासोबत 'वन नाईट स्टँड' केल्याचा सांगितलं. तिने एका मुलाखतीत याचा खुलासा केला. त्यानंतर तिचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालं आहे.

बॉलिवूड असो किंवा टीव्ही इंडस्ट्री कलाकारांचे अफेअर, घटस्फोट किंवा एक्स्ट्रामॅरेटीअल अफेअर असो. वैयक्तिक आयुष्याची चर्चा कायमच होत असते. त्यात आता ‘वन नाईट स्टँड’ हा नवीन ट्रेंड आला आहे. आधी याबद्दल कोणीच काही बोलत नव्हतं पण आता याबद्दल अनेक कलाकार उघडपणे बोलू लागले आहेत. अभिनेत्रीने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या ‘वन नाईट स्टँड’ बद्दल उघडपणे बोलली आहे.
26 वर्षाच्या मुलाशी वन नाईट स्टँड
49 वर्षाच्या अभिनेत्रीने एका 26 वर्षाच्या मुलाशी वन नाईट स्टँड केल्याचं सांगितल.एवढंच नाही तर तिने तिचा अनुभव देखील सांगितला आहे. ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे हॉलिवूडची टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेल्या शर्लिन थेरॉन. शर्लिन थेरॉनने नुकत्याच एका मुलाखतीत एक धक्कादायक खुलासा केला आहे. शर्लिन 49 वर्षांची आहे आणि तिने 26 वर्षांच्या मुलासोबत वन नाईट स्टँड केला होता. हा अनुभव खूप अद्भुत होता असं अभिनेत्री म्हणाली.
अलिकडेच, शर्लिन नेटफ्लिक्सच्या द ओल्ड गर्ड 2 मध्ये दिसली. हा चित्रपट अॅक्शन आणि ड्रामाने भरलेला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीचे पात्र दमदार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित ही घटना शेअर केली आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
वयाच्या चाळीशीनंतर मला फार स्वतंत्र्य वाटत आहे
शर्लिन एका यूट्यूब चॅनलवर गेस्ट म्हणून आली होती. यादरम्यान तिने तिची वैयक्तिक माहिती शेअर केली. ती म्हणाली “वयाच्या चाळीशीनंतर व्या वर्षी मला फार स्वतंत्र्य वाटत आहे.” एवढंच नाही तर तिने हे देखील सांगितलं की तिने 3 वेळा वन नाईट स्टँड केला.
“तो अनुभव माझ्यासाठी खूप खास होता.”
अभिनेत्रीने सांगितले की अलीकडेच तिने एका 26 वर्षांच्या मुलासोबत वन नाईट स्टँड झाला. शर्लिन म्हणाली की “तो अनुभव माझ्यासाठी खूप खास होता.” तिने सांगितले की तिने हे यापूर्वी कधीही केले नव्हते, पण जेव्हा तिने ते केले तेव्हा तिला ते आश्चर्यकारक वाटले. शर्लिन केवळ एक अभिनेत्रीच नाही तर एक यशस्वी निर्माती देखील आहे. ती एक सिंगल मदर देखील आहे, जी आता स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणे पसंत करते.
अभिनेत्रीच्या या खुलाशावर नेटकऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्रीने अॅटॉमिक ब्लोंड, हॅनकॉक, मॅड मॅक्स: फ्युरी रोड, द फेट ऑफ द फ्युरियस, एऑन फ्लक्स, स्नो व्हाइट अँड द हंट्समन सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.