
बॉलिवूड असो किंवा मग टीव्ही इंडस्ट्री सेलिब्रिटींच्या घटस्फोटाबद्दलच्या बातम्या लगेच पसरतात आणि त्याबद्दल चर्चाही होते. काही जोडपी घटस्फोटानंतरही अनेक कार्यक्रमांमध्ये एकमेकांशी मैत्रीपूर्ण बोलताना दिसतात. पण अशी एक जोडी आहे जी घटस्फोटानंतरही एकत्रच राहताना दिसतात. अभिनेत्री घटस्फोटानंतरही तिच्या एक्स पतीसोबत राहतेय. त्याच्यासोबत फिरताना, वेळ घालवताना दिसते. त्यावरून तिला नेटकरी ट्रोलही करत आहेत.
अभिनेत्री तिच्या एक्स पतीसोबत वेळ घालवत आहे.
ही अभिनेत्री म्हणजे लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींपैकी एक मानली जाणारी चारू असोपा. चारू तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. सध्या ही अभिनेत्री तिच्या एक्स पतीसोबत वेळ घालवत आहे. चारू असोपा आणि राजीव सेन हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. जरी त्यांचे लग्न अधिकृतपणे संपले असले तरी, त्यांच्या मुलीमुळे ते अनेकदा एकत्र वेळ घालवताना दिसतात.
दुर्गापूजेच्या वेळी एक्स पतीच्या घरी जाऊन केली पूजा
काही दिवसांपूर्वी, चारू तिची मुलगी आणि एक्स पती राजीवसोबत थायलंडला गेली होती. त्या काळात, चारूने तिच्या एक्स पतीसोबतचे अनेक रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. आता, दुर्गापूजेच्या वेळी देखील चारू आणि राजीव पुन्हा एकत्र दिसले.
एक्स पतीसोबत नवीन ठिकाणे एक्सप्लोर करत आहे.
त्यांनी एकत्र दुर्गापूजेला हजेरी लावली आणि कन्यापूजनात मुलीची धार्मिक पूजा केली. चारू तिचा एक्स पती राजीव सेन याच्या घरी दुर्गापूजेसाठी गेली होती. तिने संपूर्ण कुटुंबासह दुर्गापूजेचा आनंद घेतला. दुर्गापूजा संपल्यानंतरही, चारू कोलकात्यातच राहताना दिसतेय तसेच नवीन ठिकाणांना भेटी देत आहे. फिरत आहे.
दोघांच्या रोमँटीक फोटोने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
चारूने अलीकडेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये, चारू पिवळ्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये, चारू नवव्या दिवशी तिची मुलगी जियानाकडून आशीर्वाद घेताना दिसत आहे. तसेच तिने तिचा एक्स पती राजीवसोबत फोटो काढले असून त्याच्यासोबत रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. या दोघांच्या रोमँटीक फोटोने सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.
‘हे कसलं नातं आहे’ असं म्हणत नेटकऱ्यांकडून ट्रोल
सोशल मीडियावर चारूला सर्वजन ट्रोल करत आहेत. घटस्फोटावेळी एकमेकांवर आरोप केल्यानंतर घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र वेळ घालवत असल्याचं म्हणत नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. ‘हे कसलं नातं आहे’ असं म्हणत नेटकरी चारू आणि राजीव यांच्या रोमँटिक फोटोवर कमेंट्स करताना दिसत आहेत.तर काहीजण त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. लेकीसाठी अहंकार बाजूला ठेवून ते एकत्र वेळ घालवत असल्याचंही ते म्हणत आहेत.