अभिनयासाठी डॉक्टरकी सोडली; `छावा` चित्रपटाने अभिनेत्याचं नशीबच बदललं
'छावा' चित्रपटात एका अभिनेत्याने साकारलेल्या कवी कलशच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्याच्या अभिनयाने प्रेक्षकांना भारावून सोडलं आहे. एवढंच नाही तर या अभिनेत्याने अभिनयासाठी चक्क डॉक्टरकी सोडली, आपले वैद्यकीय करिअर सोडले.मात्र 'छावा' चित्रपटाने त्याचं नशीबच पालटून टाकले. कोण आहे हा अभिनेता?

छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाल्यापासून प्रत्येकाच्या ओठांवर फक्त याच चित्रपटाच नाव आणि कौतुक आहे. सिनेमा पाहून प्रेक्षक चांगलेच भारावून गेले आहेत. त्यात विकी कौशचेही कौतुक होत आहे. विकीने संभाजी महाराजांची साकारलेली भूमिका पाहून सर्वांनीच त्याचं कौतुक केलं आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचंही तेवढंच कौतुक केलं जात आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.
चित्रपटात कवी कलश यांची भूमिका केलेल्या अभिनेत्याचं सर्वत्र कौतुक
‘छावा’मध्ये सर्वच कलाकारांचा अभिनय हा उत्तम आहे. सर्वांच्याच अभिनयाच कौतुक होताना दिसत आहे. त्यात अक्षय खन्नाच्या ट्रान्स्फमेशनची आणि त्याने त्याच्या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीची प्रेक्षकांनीही पावती दिली आहे. या चित्रपटात अजून एक असा अभिनेता आहे ज्याच्या अभिनयाने सर्वांच लक्ष वेधलं. छत्रपती संभाजी महाराजांसाठी ज्याने आपल्या जिवाचीही पर्वा केली नाही असा कवी कलशची भूमिका या अभिनेत्याने केली आहे.
विनीत कुमार सिंग यांची भूमिका लक्षात राहणारी
कवी कलश म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या अगदी जवळच्या मित्र. कोणत्याही परिस्थितीत मराठा साम्राज्य आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी एकनिष्ठ राहत राहणारा एक घनिष्ठ मित्र. कवी कलश यांची भूमिका साकारणाका हा अभिनेता म्हणजे ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘मुक्काबाज’ फेम अभिनेता विनीत कुमार सिंग.’छावा’ चित्रपटात विनीतने आपल्या अभिनयाने एक वेगळी छाप पाडली आहे.
View this post on Instagram
विनीतने अभिनयासाठी डॉक्टरकी सोडली
मुख्य म्हणजे हे फार कमी जणांना माहित असेल की, विनीतने डॉक्टरकीची पदवी घेतली आहे. गपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून आयुर्वेदात एमडी पदवी घेतली आहे. पण अभिनयासाठी त्यांनी डॉक्टर पदवी सोडली. हा अभिनेता इंडस्ट्रीमध्ये गेल्या 20 वर्षांपासून आहे. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र ‘छावा’ चित्रपटामुळे नक्कीच त्याचं नशीब बदललं असं म्हणायला हरकत नाही.
विनीतचा ‘छावा’ चित्रपटातील अभिनय खूपच प्रभावी आहे. विनीतने त्याच्या अभिनयाने कवी कलशच्या पात्रात जीवंतपणा आणल्याचं दिसून येत आहे. विनीत कुमार सिंग यांची ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीमधील एक महत्त्वाची भूमिका ठरू शकते.
