Chhaava: 112 वर्षांनंतर बॉलिवूडच्या इतिहासात विक्रम रचणारा ‘छावा’ दुसरा सिनेमा, तर पहिल्या क्रमांकावर कोणता सिनेमा?

Chhaava: 112 वर्षांच्या बॉलिवूड इतिहासात विक्रम करणारा 'छावा' ठरला दुसरा सिनेमा, पहिल्या क्रमांकावर कोणता सिनेमा? घ्या जाणून, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'छावा' सिनेमाची चर्चा...

Chhaava: 112 वर्षांनंतर बॉलिवूडच्या इतिहासात विक्रम रचणारा छावा दुसरा सिनेमा, तर पहिल्या क्रमांकावर कोणता सिनेमा?
| Updated on: Feb 24, 2025 | 2:00 PM

Chhaava Box Office Collection: अभिनेता विकी कौशल स्टारर ‘छावा’ सिनेमाने आता त्याच्याच बॅनरच्या आणखी एका सिनेमा प्रमाणे विक्रम रचला आहे. ‘छावा’ 2025 चा सर्वात मोठा भारतीय सिनेमा म्हणून उदयास आला आहे. ‘छावा’ सिनेमा दररोज नवनवीन विक्रमही रचताना दिसत आहे. सांगायचं झालं तर, ‘छावा’ सिनेमाने गेल्या वर्षीच्या श्रद्धा कपूर स्टारर ब्लॉकबस्टर ‘स्त्री 2’ प्रमाणेच कामगिरी केली आहे. हे दोन्ही सिनेमे मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनले आहेत. आता एकाच प्रॉडक्शन हाऊसच्या दोन सिनेमांमध्ये ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे.

‘छावा’ सिनेमाने आतापर्यंत 334.51 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. तर ‘स्त्री 2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 597.99 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली होती. याचा अर्थ ‘छावा’ सिनेमाने अद्याप ‘स्त्री 2’ च्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनचा विक्रम मोडलेला नाही. मात्र कमाईचा वेग पाहता हा विक्रमही नष्ट होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसऱ्या रविवारी सर्वाधिक कमाई करणारे सिनेमे

‘स्त्री 2’ सिनेमाने दुसऱ्या रविवारी 42.4 कोटी रुपयांची कमाई केली. ‘स्त्री 2’ सिनेमाच्या दुसऱ्या रविवारच्या कमाईच्या आकड्याला अद्याप कोणी मागे टाकू शकलेलं नाही. ‘गदर’ सिनेमाने 38.9 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर बाहूबली सिनेमाने 34.5 कोटींचा गल्ला जमा केला.

‘स्त्री 2’ वगळता या सर्व सिनेमांना मागे टाकत ‘छावा’ने 41 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. 112 वर्षांच्या बॉलिवूड इतिहासात विक्रम करणारा ‘छावा’ दुसरा सिनेमा ठरला आहे. तर पहिला सिनेमा ‘स्त्री 2’ आहे. आता ‘छावा’ सिनेमा ‘स्त्री 2’ सिनेमाचा विक्रम मोडणार की नाही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सांगायचं झालं तर, ही यादी फक्त बॉलीवूड सिनेमांवर आधारित आहे, जर त्यात पुष्पा 2 देखील जोडला गेला तर पुष्पा 2 अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने दुसऱ्या रविवारी 54 कोटींची कमाई केली होती.

‘छावा’ सिनेमा

‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, जवळपास 130 कोटींच्या बजेटमध्ये साकारण्यात आलेला सिनेमाने 300 कोटींचा गल्ला पार केला आहे.सिनेमात विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकरण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने त्यांच्या पत्नी यसूबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे. सिनेमात अभिनेता अक्षय खन्ना आणि विनीत कुमार यांनी साकारलेल्या भूमिकेचं देखील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.