फटाक्यांचा शोध चीनमध्ये, भारतात मुघलांनी आणलं, तर हिंदूचा काय संबंध? मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Chinmay Mandlekar Post: मराठी अभनिता चिन्मय मांडलेकरने आता दिवाळीच्या मुद्यावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्याची चर्चा रंगली आहे.

फटाक्यांचा शोध चीनमध्ये, भारतात मुघलांनी आणलं, तर हिंदूचा काय संबंध? मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
| Updated on: Nov 05, 2026 | 1:55 PM
Chinmay Mandlekar Post : दिवाळी आणि फटाके हे समीकरण नेहमीच चर्चेचा विषय बनत असतो. फटाके फोडण्यामुळे होणारे प्रदूषण, नागरिकांचे आरोग्य आणि धार्मिक परंपरा यावरुन सतत वाद होत असतात. यंदाही दिवाळी सुरु होताच पुन्हा फटाक्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. दिया मिर्झाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने सांगितले होते की, प्रदूषण होत असल्यामुळे फटाके फोडू नये. यावरुन वाद आधीच रंगलेला असताना आता मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपले मत मांडले आहे. 

मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकरने आपल्या पोस्टमध्ये फटाक्याचा उगमाचा उल्लेख केला आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “फटाक्यांचा शोध चिनी लोकांनी लावला, भारतात त्याचा उगम मुघलांनी केला, मग यात हिंदू कुठे आले, हिंदू लोक फटाके फोडण्याला आपले प्रतीक मानतात. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे की,  चीनमध्ये तयार झालेल्या विषारी फटाक्यांचा सण आहे.  असा सवालही त्यानं उपस्थित केला आहे.

Loading...

 

/div>

चिन्मय मांडलेकरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” Fire Crackers फटाके पटाखे Invented By Chinese Populrised In Indiann Subcontinet By Mughals But Now Measures Of Hindu Sanskruti! Festivals Of Lights Or Festivals Of Toxic China Invented Crackeres?
या पोस्टमध्ये त्यानं हिंदू संस्कृतीला फटाक्यांशी जोडण्याच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केला आहे. दिवाळीचा खरा अर्थ प्रकास, आनंद, उत्सव आणि फराळ असा असताना फटाके फोडण्यालाच सणाचा महत्त्वाचा भाग का मानला जातो, असा प्रश्न त्याला एकंदरीतच या पोस्टमधून लोकांना विचारायचा असणार असे दिसत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) अभिनेत्री दिया मिर्झा आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना एका मोहिमेत सामील केले होते. मात्र, या मोहिमेत दिया मिर्झाच्या व्हिडिओलाच सत्ताधाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. दिया मिर्झाकडून दिवाळी कशी साजरी करायची हे शिकण्याची गरज नाही. अशी भूमिका भाजपाच्या अनेक नेत्यांनी मांडली आणि नंतर बीएमसीने हा व्हिडिओ डिलीट केला आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us