AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patekar: त्यांनी अनेक महिलांना… नाना पाटेकरांचे गुणगान गाणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री

Nana Patekar: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अनेकजण सोशल मीडियावर त्यांच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. मात्र हे पाहून एक अभिनेत्री संतापली आहे.

Nana Patekar: त्यांनी अनेक महिलांना... नाना पाटेकरांचे गुणगान गाणाऱ्यांवर भडकली अभिनेत्री
Nana patekarImage Credit source: actor mohanlal fb
| Updated on: Oct 12, 2026 | 11:34 AM
Share

८ ऑक्टोबर रोजी पहाटे बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. कलाकारांपासून बड्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातू श्रद्धांजली वाहिली. या दरम्यान अभिनेत्री तनुश्री दत्ताने जेव्हा पोस्ट केली तेव्हा तिला सोशल मीडियावर खूप ट्रोलही केले गेले. पण आता गायिका चिन्मयी श्रीपादा आणि सोना महापात्राने अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. चिन्मयीने आपल्या नव्या पोस्टमध्ये नाना पाटेकर यांची वाहवाह करणाऱ्यांना आरसा दाखवत आठवण करून दिली की नाना यांच्यावर केवळ एकाच नाही तर अनेक महिलांनी लैंगिक छळाचे आरोप केले होते.

याआधी गायिका सोना महापात्रा यांनी एक्सवर अनेक पोस्ट शेअर करून हे सिद्ध केले की नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ता यांच्याशिवायही अनेक महिलांनी छळाचे आरोप केले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एका असिस्टंट डायरेक्टरची कमेंट शेअर केली. या पोस्टमध्ये नाना पाटेकर उपस्थित असलेल्या चित्रपट सेटवर कथित गैरवर्तन करत असताना पाहिल्याचा दावा करण्यात आला होता.

आता चिन्मयी श्रीपादा यांनी सोना महापात्राची पोस्ट रीशेअर करत लोकांना नाना पाटेकर यांच्या काळ्या कृत्यांची आठवण करून दिली आहे. त्या आपल्या पोस्टमध्ये नाना यांच्या मृत्यूनंतर त्यांची स्तुती करणाऱ्यांवर टोमणे मारताना दिसत आहेत. गायिकेने नाना यांचे गुणगान गाणाऱ्यांविरुद्ध आपला रोष व्यक्त केला. तिने सोना महापात्राच्या पोस्टला रीशेअर करत लिहितात, ‘जे लोक सतत नाना पाटेकर यांचे गुणगान गात आहेत त्यांना आठवण करून देते की त्याने महिलांचा छळ केला होता. केवळ एका महिलेसोबत नाही तर अनेक महिलांचा छळ केला होता’.

आता सोना महापात्राच्या पोस्टबाबत बोलायचे झाले तर तिने अनेक स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. हे स्क्रीनशॉट त्या असिस्टंट डायरेक्टरचे असल्याचे सांगितले जात आहे ज्याने सेटवर नाना पाटेकर यांना महिलांसोबत गैरवर्तन करताना पाहिले. सोनाने लिहिले आहे की, ‘एका असिस्टंट डायरेक्टरने सेटवर गैरवर्तन करताना पाहिले’.

तिने पुढे आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘तरीही गुणगान सुरूच आहेत. आपण एका महिलेवर विश्वास कसा ठेवू शकतो, पण तुम्हाला कोणत्याही महिलेवर विश्वास ठेवण्यासाठी किती पुरावे हवेत – १० की १००? कोणाची प्रतिभा हे त्यांच्या योग्य असण्याचा पुरावा नाही. तसेच कोणी दानशूर असणे हे त्यांच्या योग्य असण्याचे प्रमाण नाही आणि मृत्यूनंतर कोणी दूधाने धुतले जात नाही’. तनुश्री दत्ता यांनी नाना पाटेकर यांच्या मृत्यूनंतर व्हिडिओ शेअर करून आपली प्रतिक्रिया दिली होती. अभिनेत्रीने म्हटले होते की नाना यांनी जिवंत असताना त्यांचे आयुष्य उध्वस्त केले आणि मृत्यूनंतरही त्यांना त्रास देत गेले.

Follow Us
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!