कोल्डप्ले अहमदाबाद कॉन्सर्ट: क्रिस मार्टिनने गायलं ‘वंदे मातरम्’ आणि ‘माँ तुझे सलाम’, स्टेडियमवर टाळ्यांच्या कडकडाट

Concert Chris Martin: कोल्डप्ले शोमध्ये क्रिस मार्टिनने गायलं 'वंदे मातरम्' आणि 'माँ तुझे सलाम', सध्या गायकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत...

कोल्डप्ले अहमदाबाद कॉन्सर्ट: क्रिस मार्टिनने गायलं वंदे मातरम् आणि माँ तुझे सलाम, स्टेडियमवर टाळ्यांच्या कडकडाट
| Updated on: Jan 27, 2025 | 8:22 AM

Concert Chris Martin: क्रिस मार्टिन याने स्वतःचा बँड कोल्डप्लेच्या साथीदारांसोबत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दमदार परफॉर्मेन्स दिला. पण क्रिस मार्टिन याने खास काही गाणी गायल्यानंतर चाहत्यांनी टाळ्यांच्या कडकडाट केला. प्रजासत्ताक दिनी क्रिस याने ‘वंदे मातरम’ आणि ‘माँ तुझे सलाम’ गाणं गायल्यानंतर चाहत्यांचा उत्साह दिसून आला. क्रिसने दोन गाणी गायल्यानंतर स्टेडियममध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. कोल्डप्लेचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

कोल्डप्लेचा कॉन्सर्ट 25 आणि 26 जानेवारी रोजी मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. बँडने 18 जानेवारी रोजी मुंबईत त्यांच्या म्युझिक ऑफ द स्फेअर्स इंडिया टूरला सुरुवात केली. त्यांनी 18, 19 आणि 21 जानेवारी रोजी नवी मुंबईतील डीव्हाय पाटील स्टेडियममध्ये सादरीकरण केले.

 

 

 

क्रिस मार्टिनने केलं शाहरुख खानचा उल्लेख

कॉन्सर्टच्या दरम्यान, कोल्डप्लेने अभिनेता शाहरुख खान आणि क्रिकेटर जसप्रित बुमराह यांना शुभेच्छा दिल्या. एवढंच नाही तर, भूतकाळात ब्रिटीश राजवटीत झालेल्या अत्याचाराबद्दल भारताची माफी देखील मागितली. सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यात क्रिस मार्टिनही सहभागी झाला होता.

ओटीटीवर पाहू शकता शो

26 जानेवारी रोजी शो Disney+ Hotstar वर प्रदर्शित करण्यात आळा. संध्याकाळी 7:45 क्रिस मार्टिन याचा लाईव्ह परफॉर्मेन्स प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून फक्त आणि फक्त कोल्डप्ले शोची चर्चा सुरु आहे.