Cirkus Teaser: रणवीर सिंगच्या ‘सर्कस’मध्ये कलाकारांची मांदियाळी; तरी टीझर पाहून चाहते निराश!

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Nov 28, 2022 | 1:34 PM

1960 च्या दशकात घेऊन जाणार रोहित शेट्टीचा हा 'सर्कस'; पहा टीझर..

Cirkus Teaser: रणवीर सिंगच्या 'सर्कस'मध्ये कलाकारांची मांदियाळी; तरी टीझर पाहून चाहते निराश!
Cirkus teaser
Image Credit source: Youtube

मुंबई: रोहित शेट्टीच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘सर्कस’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘अ कॉमेडी ऑफ इरर्स’ या नाटकावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये रणवीर सिंग दुहेरी भूमिकेत पहायला मिळतोय. करिअरमध्ये पहिल्यांदाच रणवीर अशी दुहेरी भूमिका साकारतोय. 1960 च्या दशकातील कथा प्रेक्षकांना या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. मात्र सर्कसच्या टीझरने प्रेक्षकांची निराशा केली आहे.

सहसा चित्रपटाच्या टीझरमध्ये महत्त्वपूर्ण दृश्ये, डायलॉग्स पहायला मिळतात. मात्र सर्कसच्या टीझरमधून ट्रेलरची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळेच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जवळपास एक मिनिटाच्या या टीझरमध्ये चित्रपटातील कोणतंच दृश्य पहायला मिळत नाही. मात्र सर्कसच्या बाहेर पायऱ्यांवर चित्रपटातील कलाकार बसलेले असून ते प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसत आहेत.

पहा टीझर-

संजय मिश्रा आणि जॉनी लिव्हर हे प्रेक्षकांना 60 च्या दशकाची, जुन्या सुंदर दिवसांची आठवण करून देतात. त्यानंतर रणवीरच्या दोन्ही भूमिका पहायला मिळतात. ‘सर्कस ही त्या वेळची कथा आहे जेव्हा आई-वडिलांचं प्रेम हे सोशल मीडियावरील लाईक्सपेक्षा जास्त महत्त्वाचं होतं’, असं तो म्हणतो.

सर्कसचा ट्रेलर येत्या 2 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याचीही घोषणा या टीझरमध्ये करण्यात आली. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, विजय पाटकर, सुलभा आर्या, टिकू तलसानिया, वृजेश हिरजी, अश्विनी काळसेकर आणि मुरली शर्मा यांच्याही भूमिका आहेत. या वर्षाच्या अखेरीस ख्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच 24 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI