प्रणित मोरेच्या वादावर विनोदी कलाकार सुनील पाल यांची संतप्त प्रतिक्रिया, केली मोठी मागणी
प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरेच्या वादावर आता सुनील पाल यांनी कडक आणि तीव्र शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबत त्यांनी कडक मागणी देखील केली आहे.

स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या शोमध्ये झालेल्या वादग्रस्त विनोदांवर आता ज्येष्ठ विनोदी कलाकार सुनील पाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘370 रुपयांच्या बिर्याणी’ संदर्भातील आक्षेपार्ह विनोद आणि मृतदेहाच्या अवयवांवर करण्यात आलेल्या टिप्पणीवर बोलताना सुनील पाल यांनी अशा प्रकारच्या कॉमेडीला समाजासाठी घातक ठरवत संबंधित कलाकारांवर जोरदार टीका केली.
अलीकडेच प्रणित मोरेच्या शोमध्ये प्रेक्षकांमधील 22 वर्षीय तरुणाने आपला डेटिंगचा अनुभव सांगताना वादग्रस्त विधान केले होते. त्याने एका मुलीला 370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातल्यानंतर त्याचे पैसे वसूल करण्यासाठी शारीरिक जवळीकीचा संकेत दिल्याचा दावा केला. त्यानंतर मुलीला घरी सोडण्याऐवजी तिला खोलीवर किंवा पार्कमध्ये नेण्याचा विचार केल्याचेही त्याने विनोदाच्या स्वरूपात सांगितले. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.
याच कार्यक्रमात डॉक्टर सेजल नावाच्या महिलेनेही मृतदेहाच्या खासगी अवयवांबाबत केलेला विनोद प्रेक्षकांसमोर मांडला. शवविच्छेदनादरम्यान मृतदेहाचे खासगी अवयवांच्या आकाराची खिल्ली उडवली जाते असे तिने सांगितले. या विधानावरही मोठ्या प्रमाणात टीका झाली.
सुनील पाल यांचा संताप
या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सुनील पाल यांनी अशा प्रकारच्या कलाकारांना समाजाचे दहशतवादी संबोधले. त्यांनी म्हटले की, आजकाल काही मुलं-मुली कॉमेडीच्या नावाखाली अश्लीलता आणि अभद्र भाषा वापरत आहेत. यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होत असला तरी देशातील तरुण पिढीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्या मते, समाजातील युवकांना चुकीच्या दिशेने नेण्याचे काम अशा प्रकारच्या कॉमेडीद्वारे होत असून विनोदाच्या नावाखाली संस्कृतीचे नुकसान केले जात आहे.
सुनील पाल यांनी कार्यक्रम आयोजित करणाऱ्या वेन्यू व्यवस्थापनालाही जबाबदार धरले. त्यांनी म्हटले की, ज्या ठिकाणी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, त्या ठिकाणी स्पष्ट नियम असायला हवेत. कार्यक्रमांमध्ये शिवीगाळ, अश्लील भाषा, अभद्र वक्तव्ये किंवा संवेदनशील विषयांवर आक्षेपार्ह पद्धतीने चर्चा होणार नाही, याची खात्री आयोजकांनी करावी. त्यांच्या मते, अशा प्रकारच्या कठोर नियमांमुळे आणि कायद्यांमुळेच या प्रकारच्या वादग्रस्त कॉमेडीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.
Watch: On Maharashtra Cyber Department registered an FIR against the comedian following the 370 Biryani controversy case
Comedian Sunil Pal says, “Comedy in the name of obscenity has become a regular trend these days. Many boys and girls are seen holding mikes and performing in… pic.twitter.com/0GxiKUD0ap
— IANS (@ians_india) June 12, 2026
‘अशा कलाकारांना व्यासपीठ का दिले जाते?’
सुनील पाल यांनी मनोरंजन क्षेत्रालाही प्रश्न विचारला. त्यांनी विचारले की, अशा वादग्रस्त कलाकारांना लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये संधी का दिली जाते? चांगली, स्वच्छ आणि कुटुंबासोबत पाहता येईल अशी कॉमेडी करणाऱ्या कलाकारांकडे दुर्लक्ष का केले जाते? त्यांच्या मते, जर दर्जेदार विनोद करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन दिले गेले नाही तर अशा वादग्रस्त आणि अश्लील कंटेंटचेच बाजारात वर्चस्व वाढेल. त्यामुळे कॉमेडीच्या नावावरचा हा कलंक अधिक पसरत जाईल.