सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, 5 आरोपींवर आरोप निश्चित

Salman Khan : अभिनेता सलमान खान याला अनेकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. एप्रिल 2024 मध्ये सलमान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. आता देखील याप्रकरणी कोर्टाने मोठा निर्णय सुनावला आहे.

सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, 5 आरोपींवर आरोप निश्चित
सलमान खान
| Updated on: Nov 27, 2025 | 8:34 AM

Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर फायरिंग प्रकरणात 5 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मुंबई सत्र न्यायालय विशेष मकोका कोर्टाने आरोपींच्या विरोधात 15 आरोप निश्चित केले आहेत. 14 एप्रिल 2024 रोजी वांद्रे येथील सलमान खानच्या गॅलेक्सी आपोर्टमेंटवर लारेन्स बिष्णोई गँग कडून गोळीबार करणयात आला होता. सलमान याच्या हत्या करण्याच्या उदद्देश्यने करण्यात आलेल्या या हल्ल्यात आरोपी लारेन्स बिष्णोई हा स्वतः अद्याप फरार असून त्याचा भाऊ अनमोल बिष्णोईला नुकताच प्रत्यर्पित करून भारतात आणलं आहे.

विकी कुमार गुप्ता ( 24) ,सागर कुमार पाल (23 ) , सोनू कुमार बिष्णोई (35), मोहम्मद सरदार चौधरी (37) आणि हरपाल सिंग उर्फ हैरी ( 25 ) या आरोपींच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले. आरोपींच्या विरोधात विशेष मकोका कायदा , आय पी सी , आर्म्स कायदा ,महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत विशेष न्यायाधीश महेश के . जाधव यांनी आरोप निश्चित केले आहे. सध्या याप्रकरणी पुढील चौकशी सुरु आहे.

याप्रकरणी आरोपी मोहम्मद सरदार चौधरी याने सर्वांत मोठी भूमिका बजावली असल्याचं देखील कोर्टाने सांगितलं. त्याने जाणूनबुजून या गुन्ह्यात भाग घेतला होता. तपासात असं दिसून आलं की, घटनेच्या दोन दिवस आधी मोहम्मद रफिक चौधरी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेर दिसला होता. त्याने एक रेकी व्हिडिओ शूट केला होता आणि तो लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोईला पाठवला होता.

सलमान खान याला सतत मिळणाऱ्या धमक्या

सांगायचं झालं तर, याआधी देखील अनेकदा सलमान खान याला अनेकदा जीवेमारण्याची धमकी देण्यात आली. सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे सलमान खान याच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. सांगायचं झालं तर, 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जोधपूरजवळ काळवीट शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे.

सलमान खान का आहे लॉरेन्स बिश्नोई याच्या निशाण्यावर?

एनआयएच्या चौकशीत लॉरेन्स बिश्नोईने सांगितलं की, सलमानला त्याच्या हिटलिस्टमध्ये टॉपवर ठेवलं आहे. त्याचं कारणही त्याने सांगितले. 1998 मध्ये सलमान खान यानं काळवीटाची शिकार केली होती. त्यामुळे तो सलमान खानवर नाराज होता. बिश्नोई समाजात हरणाची पूजा केली जाते. त्यामुळे लॉरेन्स बिश्नोई सलमान खानच्या जीवाचा शत्रू बनला आहे.