
Champions Trophy 2025: सिनेविश्व आणि क्रिकेट विश्वात घटस्फोटाचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू युजवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या यांच्यानंतर आता आणखी एका खेळाडूच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. सध्या ज्या क्रिकेटपटूच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे, त्या क्रिकेटपटूची पत्नी अभिनेत्री आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, मनीष पांडे आणि आश्रिता शेट्टी यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. 2019 मध्ये दोघांनी लग्न केलं होतं. पण आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
रिपोर्टनुसार, मनीषने 68 अंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात दमदार कामगिरी केली आहे. सांगायचं झालं तर, मनीष हा एक उत्तम भारतीय क्रिकेटर आहे जो अनेक क्रिकेट टूर्नामेंटचा भाग राहिला आहे. तो कोलकाता नाईट रायडर्सचा एक भाग आहे आणि 2018 च्या टीम इंडिया आशिया कपमध्येही त्याने भाग घेतला आहे. त्याने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली आणि कर्णधारपदाखाली संघाला आयपीएल जिंकून दिले.
मनीष याच्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, आश्रिता शेट्टी हिने तामिळ सिनेविश्वात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण लग्नानंतर आश्रिता फार कमी सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. पण आश्रिता सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
मनिष आणि आश्रिता यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले सर्व फोटो डीलिट केले आहेत. शिवाय दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो देखील केलं आहे. एवढंच नाही तर, कोणत्या कार्यक्रमात किंवा सोहळ्यात देखील दोघे एकत्र दिसत नाहीत. याच कारणांमुळे मनिष आणि आश्रिता यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण दोघांनी देखील यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
मनिष आणि आश्रिता यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, दोघांनी गुपचूप लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आश्रिता आणि मनिष यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2 डिसेंबर 2019 मध्ये आश्रिता आणि मनिष यांनी लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.