युजवेंद्र चहलसोबत ‘मिस्ट्री गर्ल’ शेअर केलाय खास व्हिडीओ, व्हिडीओ पोस्ट ती म्हणाली, ‘सांगितलं होतं ना…’
Champions Trophy 2025 : घटस्फोटानंतर युजवेंद्र चहलसोबत दिसणाऱ्या ‘मिस्ट्री गर्ल’चा खास व्हिडीओ, स्वतःच व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली, 'सांगितलं होतं ना...', युजवेंद्र यांच्या खासगी आयुष्याच्या सर्वत्र रंगल्या आहेत चर्चा...

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्युझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. भारतीय क्रिकेट संघाच्या यशानंतर संपूर्ण भारतात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान, सामन्या दरम्यान एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला तो म्हणजे युजवेंद्र चहल… दुबईत रंगलेल्या सामन्यात युजवेंद्र एका ‘मिस्ट्री गर्ल’ सोबत दिसला. घटस्फोटानंतर एका ‘मिस्ट्री गर्ल’ सोबत दिसल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, ‘मिस्ट्री गर्ल’ने देखील सोशल मीडियावर व्हिडीओ आणि काही फोटो पोस्ट केले आहे.
सध्या ‘मिस्ट्री गर्ल’ची सोशल मीडिया पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, व्हिडीओसाठी तिने लिहिलेल्या कॅप्शनने देखील सर्वांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणाली, ‘सांगितलं होतं ना जिंकवून येईल… मी भारतीय संघासाठी लकी आहे…’ तिच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
युजवेंद्र याच्यासोबत दिसलेल्या ‘मिस्ट्री गर्ल’बद्दल सांगायचं झालं तर, तिचं नाव आरजे मैहवश आहे. दिल्ली येथील प्रसिद्ध रेडियो जॉकी आहे. सोशल मीडियावर देखील मैहवश कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे 1.7 मिलियन फॉलोअर्स आहे. तर मैहवश फक्त 590 जणांना फॉलो करते.
मैहवश आणि युजवेंद्र यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, यापूर्वी देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण तेव्हा मैहवशने आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असं सांगितलं होतं. पण आता दोघांना एकत्र पाहिल्यानंतर अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.
युजवेंद्र आणि धनश्री
युजवेंद्र आणि धनश्री यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाला 4 वर्ष झाली. पण गेल्या काही दिवसांपासून सतत दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांचा घटस्फोट झालाय असं देखील सांगण्यात येत आहे. दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.
