Marathi Serial : ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेच्या सेटवर चिमुकला चाहता; पाहा काय झाले?

स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. (Cute Fan on the set of ‘Dakhhancha Raja Jyotiba’ serial)

  • Updated On - 3:55 pm, Sun, 28 February 21
Marathi Serial : ‘दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेच्या सेटवर चिमुकला चाहता; पाहा काय झाले?

मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेची (Marathi Serial) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. थोरामोठ्यांसोबतच लहानग्यांना देखिल ही मालिका आवडते आहे. याचीच पोचपावती देणारा एक प्रसंग नुकताच घडलाय. ज्योतिबांवर भरभरुन प्रेम करणारा एक चिमुकला चाहता नुकतंच सेटवर पोहोचला. विशेष म्हणजे ज्योतिबासारखीच वेशभुषा करत त्यानं या सेटवर हजेरी लावली होती. या चिमुकल्या चाहत्याला भेटून सेटवर सगळेच जण भारावून गेले होते. (Cute Fan on the set of ‘Dakhhancha Raja Jyotiba’ serial)

Dakhhan Cha Raja Jyotiba 2

ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमला आनंद

या छोट्या चाहत्याला भेटून ज्योतिबाची भूमिका साकारणाऱ्या विशाल निकमचा आनंदही गगनात मावत नव्हता, ‘अश्या चाहत्यांमुळेच काम करायला नवी ऊर्जा मिळते. दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका लहान मुलांनाही आवडते आहे याचा आनंद आहे. सेटवर पोहोचलेल्या या चिमुकल्याला तर मालिकेचं संपूर्ण शीर्षकगीत पाठ होतं आणि ते त्यांना आम्हा सर्वांसमोर सादर केलं. प्रेक्षकांचं हे प्रेम असंच राहो अशी भावना विशालने व्यक्त केली.’

Dakhhan Cha Raja Jyotiba 2

विशाल निकमचा फिटनेह मंत्रा

फिट राहण्यासाठी आणि उत्तम लाईफस्टाईलसाठी तुमचे लाडके कलाकार जीम, वर्कआऊट, योगा आणि डान्स यासारख्या अनेक गोष्टी करत असतात. यात ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत ज्योतिबा साकारणारा विशाल निकमही मागे नाहीये. ज्योतिबांची भूमिका साकारण्यासाठी विशाल भरपूर मेहनत घेतोय. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढत विशाल वर्कआऊट करतो. खरंतर शूटिंगमधून जीमसाठी वेगळा वेळ काढणं शक्य होत नाही त्यामुळे विशालनं चक्क सेटवरच वर्कआऊट करणं सुरू केलं आहे.

भूमिकेसाठी शरीर फिट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे विशालनं हा नवा मार्ग शोधून काढला आहे. सेटवरच्या वस्तूंचा वापर करत त्यानं सेटलाच जीम बनवलं आहे. विशाल शुद्ध शाकाहरी व्यक्ती आहे. त्यामुळे दूध, मोड आलेली कडधान्य, ताज्या भाज्या आणि फळं अश्या सकस आहाराकडे नेहमीच त्याचा कल असतो. सोबत दररोजचा व्यायाम केल्यामुळे विशालला शरीर फिट ठेवणं शक्य झालं आहे.

संबंधित बातम्या

साराचा बहिणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

Video : माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारावर रिक्षा चालवण्याची वेळ

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI