साराचा बहिणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मीडियावर कायम अॅक्टीव्ह असते. सारा आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:36 PM, 28 Feb 2021
साराचा बहिणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोशल मीडियावर कायम अॅक्टिव असते. सारा आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये साराच्या मांडीवर लहान मुलगी बसलेली दिसत आहे. (Photo of Sara Ali Khan with her sister goes viral on social media)

ही मुलगी नेमकी कोण याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. साराच्या मांडीवर बसलेली ही मुलगी म्हणजे साराची बहीण इनाया ही आत्तेबहीण आहे. इनाया ही अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री तसंच साराची आत्या सोहा अली खान यांची मुलगी आहे. काही वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर 2015 साली या दोघांनी लग्न केलं होत आणि त्याचीच ही मुलगी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

साराने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, आम्ही बहिणी बहिणी आमच्या फॅमिली ट्रीची गोड फळं आहोत आणि कायम राहू….साराचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झालेतर, ती अखेर ‘कुली नंबर 1’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. सारा अली खान दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ मध्ये अक्षय कुमार आणि धनुषसोबत दिसणार आहे.

सारा अली खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.. या व्हिडीओमध्ये सारा करीनाच्या घरी जाताना दिसत होती. तिच्या हातात खास बाळासाठी आणि करीनासाठी भेटवस्तू असल्याचं पाहायला मिळाले होते. हा व्हिडीओ विरल भैय्यानी यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
करीना आणि सारा या दोघीं खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.

बऱ्याच वेळा या दोघीही त्यांच्यातील नात्याविषयी उघडपणे व्यक्त झाल्या आहेत. करीनानेही साराला तिच्या पहिल्या चित्रपटासाठी मदत केली होती. विशेष म्हणजे सारा आणि तैमुर या दोघांमध्येही चांगली मैत्री आहे, सारा तैमुरच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच वेगवेगळे फोटो शेअर करत असते आणि त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देखील देते.

संबंधित बातम्या :

Video : डान्स दिवानेच्या सेटवर जलवा, वाचा डान्सर ते रिक्षा चालक फिरोज यांचा थक्क करणारा प्रवास

‘गंगूबाई काठियावाडी’चे शूटिंग सुरू, अजय देवगणही चित्रीकरणात व्यस्त; पाहा फोटो

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मुंबईत धक्काबुक्की, विनयभंग प्रकरणी आरोपीला अटक

(Photo of Sara Ali Khan with her sister goes viral on social media)