AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतमी पाटीलचा धमाका थेट मोठ्या पडद्यावर, ‘द महाराष्ट्र फाईल्स’ दिग्दर्शकाच्या सिनेमात वर्णी..

Gautami Patil Movie : गौतमी पाटील कायमच चर्चेत असलेले नाव आहे. दहीहंडीत गौतमी पाटील हिचा जलवा बघायला मिळाला. अनेक मंडळांनी गौतमी पाटील हिला बोलावले होते. गौतमी पाटीलचा धमाका बघायला मिळाला. आता गौतमी पाटील मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

गौतमी पाटीलचा धमाका थेट मोठ्या पडद्यावर, 'द महाराष्ट्र फाईल्स' दिग्दर्शकाच्या सिनेमात वर्णी..
Gautami Patil
| Updated on: Sep 09, 2026 | 11:32 AM
Share

गौतमी पाटील तूफान चर्चेत असलेले नाव आहे. गौतमी पाटील आणि तिचा डान्स हा कायमच चर्चेत असतो. दहीहंडी उत्सवात गौतमी पाटील हिचा जलवा बघायला मिळाला. मात्र,  त्यानंतर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर गौतमी पाटील अडचणीत आली. गौतमी पाटील आणि गर्दी हे समीकरण ठरले आहे. गौतमी जिथे जाते तिथे गर्दी होतेच होते. बऱ्याचदा गौतमीच्या कार्यक्रमात बसायला जागा नसते. गौतमीच्या कार्यक्रमात इतकी गर्दी असते की, पोलिसांना जमावावर लाठीमार करावा लागतो. पण काही केल्या गर्दी कमी होत नाही. बावऱ्या नावाच्या बैलासमोर गौतमीने लावणी केली होती, ज्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला. ज्यानंतर तूफान टीका झाली. आता गौतमी पाटील थेट सिनेमात दिसणार आहे. बड्या पडद्यावर गौतमी पाटील दिसेल.

बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. देवघर ऑन रेंट हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सिनेमा सध्या त्याच्या हटके लूकमध्ये चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा डीझर रिलीज झाला. या चित्रपटात गौतमी पाटील दिसणार आहे. द महाराष्ट्र फाईल्स चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात गौतमी पाटील हिची वर्णी लागली आहे.

आध्यात्म, गूढरहस्य आणि थरार या या चित्रपटात बघायला मिळेल. देवघर ऑन रेंट ने आपल्या खास आणि वेगळ्या विषयाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. या टीझरमुळे लोकांमधील उत्सुकता अजून वाढली आहे. रहस्यमय घटनांचा मागोवा घेणारा पोलिस तपास यात दिसत आहे. या चित्रपटात रहस्यामागे नक्की काय दडलंय याची उत्सुकता चाहत्यांमध्ये प्रचंड दिसत आहे. डिझरमध्ये चेहऱ्यांवरील तणाव, संघर्ष दिसत आहे.

विशेष म्हणजे चित्रपटात स्टारकास्ट वेगळी आहे. अभिनेता निखिल चव्हाण,अंकित मोहन, भाऊ कदम, वैभव चव्हाण, शशांक शेंडे, अश्विनी चावरे, सुरेश विश्वकर्मा, अनिल नागरकर, सिद्धेश्वर झाडबुके हे महत्वाच्या भूमिकेत असतील. विशेष म्हणजे या चित्रपटात डान्सर गौतमी पाटीलही दिसणार आहे. हैद्राबाद, बेळगाव, बडोदा आणि इंदूर येथे चित्रपटाचे शूट करण्यात आले.

Follow Us
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी
तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे..
Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा
गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्...
Ganpati Idol Collapsed | गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्, पुढे जे झालं...
DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
Amruta Fadnavis | DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! हाकेंची मोठी घोषणा
Laxman Hake | ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; पुढे म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ...
Corporator's Funds | मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ; 60 लाखांऐवजी आता मिळणार तब्बल...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान!
Rohit Pawar | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान! अजितदादांच्या गटाने भाजपची साथ सोडली तर...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस; सरकारचा मोठा निर्णय
राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या विमानाला लँडिंगवेळी तांत्रिक अडचण! पहिला प्रयत्न फसला; दुसऱ्या प्रयत्नात विमान सुखरूप उतरलं