AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे तुम्ही डार्लिंग लोक आहात रे…गौतमी पाटील याच व्हिडीओमुळे अडचणीत; स्टेजवरची ती अॅक्शन भोवणार?

दहीहंडीच्या कार्यक्रमातील गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. चाहत्यांच्या त्या मागणीवर गौतमीने जे म्हटलं ते ऐकून सर्वच थक्क झालेत. नेमकं काय म्हणाली गौतमी?

अरे तुम्ही डार्लिंग लोक आहात रे...गौतमी पाटील याच व्हिडीओमुळे अडचणीत;  स्टेजवरची ती अॅक्शन भोवणार?
| Updated on: Sep 08, 2026 | 4:54 PM
Share

नृत्यांगना गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलचा चाहत्यांशी संवाद साधतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गौतमी चाहत्यांशी संवाद साधताना दिसत असून, तिच्या बोलण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये गौतमी पाटील चाहत्यांशी संवाद साधताना “आरे डार्लिंग लोक आहेत रे तुम्ही माझे, हिकडे मी भाव हे ते मानत नाही बरका, एक पप्पी देते तुम्हाला” असे म्हणताना दिसत आहे. हा व्हिडीओ दहीहंडीच्या कार्यक्रमातील असल्याचे सांगितले जात आहे. कार्यक्रमात नृत्य सादर केल्यानंतर गौतमीने चाहत्यांशी संवाद साधला. याच संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

दहीहंडीतील कार्यक्रमानंतर वादाला तोंड

गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून तिच्या नृत्यशैली, हावभाव आणि कार्यक्रमांतील संवादांमुळे चर्चेत आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमात तिच्या डान्सनंतर पुन्हा एकदा तिच्यावर टीका होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता गौतमी पाटीलच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

भाजप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गौतमी पाटीलविरोधात तक्रार दाखल केल्याचे सांगितले जात आहे. केवळ गौतमी पाटीलच नाही तर कार्यक्रमाच्या आयोजकांवरही कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

‘राजकीय म्हणून नाही, एक महिला म्हणून तक्रार’

तक्रार दाखल केल्यानंतर मृणाल पेंडसे यांनी आपण ही तक्रार कोणत्याही राजकीय हेतूने केली नसल्याचे म्हटले आहे. “राजकीय म्हणून मी तक्रार करण्यासाठी आलेली नसून एक महिला म्हणून तक्रार करत आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगितले जात आहे.

तसेच, कोणताही राजकीय पक्ष असो, त्याच्याशी आपल्याला काहीही देणेघेणे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारचे कथित अश्लील हावभाव, नृत्य आणि संवाद सादर केले जात असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला आहे.

गौतमीसह आयोजकांवर कारवाईची मागणी

गौतमी पाटीलने दहीहंडीच्या कार्यक्रमात अश्लील हावभाव, अश्लील नृत्य आणि डायलॉगबाजी केल्याचा आरोप मृणाल पेंडसे यांनी केला आहे. त्यामुळे गौतमी पाटील आणि संबंधित कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Follow Us
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप
Sambhaji Bhide | दहीहंडीत महिलांना नाचवणारे देशद्रोही! संभाजी भिडेंचा संताप; हिंदू सणांमधून डॉल्बी-डीजे हद्दपार करण्याची केली मागणी
आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! विखे-पाटलांचा जरांगेंना संदेश
Radhakrishna Vikhepatil | आता शिष्टमंडळ पुन्हा चर्चेला जाणार नाही! राधाकृष्ण विखे-पाटलांचा जरांगेंना स्पष्ट संदेश
पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट
Water Shortage | पाऊस गायब अन् धरणं कोरडी पडू लागली! मराठवाड्यात दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांसमोर मोठं संकट
संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले
Pune Protest | संतोष पंडित प्रकरणात नवा ट्विस्ट! तक्रारदार महिलेच्या समर्थनार्थ नागरिक एकवटले; ट्रोलर्सविरोधात कठोर कारवाईची मागणी
लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन्... वाघ यांचा पटोलेंवर घणाघात
Chitra Wagh | लाडक्या बहिणींना ओवाळणी मिळाली अन् सावत्र भावाच्या... चित्रा वाघ यांचा नाना पटोलेंवर घणाघात