AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणातला ‘कांतारा’? ‘दशावतार’चा जबरदस्त टीझर, एकापेक्षा एक दमदार कलाकारांची फौज

'दशावतार' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. काहीतरी नवीन पहायला मिळणार, असं म्हणत प्रेक्षकांनी उत्सुकता व्यक्त केली आहे. या चित्रपटात दमदार कलाकारांची फौज पहायला मिळतेय.

कोकणातला 'कांतारा'? ‘दशावतार’चा जबरदस्त टीझर, एकापेक्षा एक दमदार कलाकारांची फौज
Dashavatar TeaserImage Credit source: Youtube
| Updated on: Aug 04, 2025 | 2:21 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणाऱ्या ‘दशावतार’ या आगामी चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या उत्सुकतेला चांगलंच उधाण आलं आहे. प्रतिभावान अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत हा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित या चित्रपटात मराठीतील दिग्गज आणि अत्यंत ताकदीचे कलाकार एकत्र आले आहेत. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव,विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे अशा दर्जेदार कलाकारांची मांदियाळी या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसून आली आहे.

‘दशावतार’ हा चित्रपट केवळ एक सस्पेन्स थ्रिलर नसून, भावनांचा, रूढी परंपरांचा, पारंपरिक लोककलेचा आणि आधुनिक आव्हानांचा खेळ असावा असं या टीझरमधून लक्षात येत आहे. टीझरमध्ये दाखवलेली दृश्ये गूढता, भव्यता आणि थरार निर्माण करणारी आहेत. प्रत्येक पात्राची झलक दाखवणारा हा टीझर प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आणि चित्रपटाची उत्सुकता अधिक ताणणारा आहे. कोकणातील भव्य निसर्ग दृश्ये, दशावतारी कलेशी संबंधित दृश्य आणि घनदाट अरण्य पाहून हा नेहमीपेक्षा वेगळा अनुभव देणारा चित्रपट असेल याची खात्री पटते आहे.

या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक सुबोध खानोलकर म्हणाले, “‘दशावतार’ ही कोकणातील मातीशी घट्ट जुळलेली पण जगभरातल्या प्रेक्षकांना सहज आपलीशी वाटेल अशी गोष्ट आहे. त्यातली भव्यता, थरारक प्रसंग आणि भावनिक क्षण हे प्रेक्षकांना आजवर न पाहिलेला अनुभव देतील अशी खात्री आहे. हा अनुभव घ्यायला चित्रपटगृहातच यावं लागेल अशा पद्धतीचा हा चित्रपट आहे.”

चित्रपटाचे निर्माते सुजय हांडे म्हणाले, “या चित्रपटाच्या भव्यतेची झलक टीझरमध्येच दिसून येते. यात प्रेक्षकांना सिनेमॅटिकली काहीतरी नवीन आणि वेगळं पाहायला मिळणार आहे. अनुभवी कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाने चित्रपट अधिक उठून दिसतो.”

“बदलत्या काळानुसार मराठी प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची अभिरुचीसुद्धा बदलत आहे. हीच बाब लक्षात घेऊन दर्जा सोबतच नाविन्याची जोड असणाऱ्या कथांना प्राधान्य देण्याचे काम झी स्टुडिओज करत आहे. प्रेक्षकांना आपल्या मातीतील गोष्ट अतिशय वेगळ्या ढंगाने सांगणारा हा चित्रपट असून या चित्रपटामुळे प्रेक्षकांमध्ये आणि सिनेसृष्टीमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास झी स्टुडिओच्या टीमला आहे”, अशी प्रतिक्रिया झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी दिली. येत्या 12 सप्टेंबरला ‘दशावतार’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.