CAA विरोधात आंदोलनात सहभागी होण्यासाठी दीपिका पदुकोणने पाकिस्तानकडून पाच कोटी घेतले; माजी RAW अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा

दिल्लीत CAA विरोधात आंदोलनात सहभागी होण्यासाठी दीपिका पदुकोणने पाकिस्तानीकडून पाच कोटी रुपये घेतले. अनिल मुसरतच्या विनंतीवरूनच दीपिका पदुकोण जेएनयूमध्ये सीएएविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जेएनयूमध्ये गेली होती असे सूद म्हणाले. दीपिका आंदोलन ठिकाणी ना कुणाशी बोलली.. ना कुणाशी तिने संवाद साधला. ती तिथे काही काळ थांबली आणि त्यानंतर तिथून ती निघून गेली. दीपिकाला तिथे जाण्यासाठी 5 कोटी देण्यात आले. याची अंमलबजावणी संचालनालयाकडून(ED) तपासणी केली जात असल्याचे सूद यांनी सांगीतले. यानंतर आयएसआयचे महासंचालक आसिफ गफूर यांनी दीपिकाचे कौतुक केल्याचेही सूद म्हणाले.

CAA विरोधात आंदोलनात सहभागी होण्यासाठी दीपिका पदुकोणने पाकिस्तानकडून पाच कोटी घेतले; माजी RAW अधिकाऱ्याचा खळबळजनक खुलासा
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 4:41 PM

मुंबई : पती रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) याच्या न्यूड फोटोशूटमुळे अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) चांगलीच ट्रोल होत आहे. न्यूड फोटोशूट प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यातच आता दीपिका पदुकोणबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2020 मध्ये दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू(JNU) विद्यापीठात CAA विरोधात झालेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दीपिका पदुकोणने पाकिस्तानीकडून पाच कोटी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका माजी RAW अधिकाऱ्याने हा खळबळजनक खुलासा केला आहे. रॉचे माजी अधिकारी एनके सूद( Ex-RAW officer NK Sood) यांनी दीपिकाबाबत हा खळबळजनक दावा केला आहे.

यापूर्वी देखील सूद यांनी बॉलिवूडबाबत अनेक मोठे खुलासे केले होते.अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ब्रिटिश-पाकिस्तानी उद्योगपती अनिल मुसरत यांच्या चांगलेच संबध आहेत. इतकेच नाही तर अनिल मसरत हे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे खूप चांगले मित्र असल्याचा दावा सूद यांनी केला आहे. मुसरत हा अनील मुसरतने इम्रान खान पीटीआय पक्षाला निधी देत असल्याचे सूद म्हणाले.

अनिल मुसरत लंडनला येतो तेव्हा तो आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराच्या लोकांसाठी पार्टी आयोजित करतो. मुसरत बाबत बोलताना सुद यांनी दीपिकावर मोठा आरोप केला आहे. भारतविरोधी कारवायांमध्ये अनिल मुसरत नेहमीच सहभागी असतो. लंडनमध्ये सीएएविरोधात झालेल्या आंदोलनालाही अनिलने आर्थिक मदत केली होती.

दिल्लीत CAA विरोधात आंदोलनात सहभागी होण्यासाठी दीपिका पदुकोणने पाकिस्तानीकडून पाच कोटी रुपये घेतले. अनिल मुसरतच्या विनंतीवरूनच दीपिका पदुकोण जेएनयूमध्ये सीएएविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जेएनयूमध्ये गेली होती असे सूद म्हणाले. दीपिका आंदोलन ठिकाणी ना कुणाशी बोलली.. ना कुणाशी तिने संवाद साधला. ती तिथे काही काळ थांबली आणि त्यानंतर तिथून ती निघून गेली. दीपिकाला तिथे जाण्यासाठी 5 कोटी देण्यात आले. याची अंमलबजावणी संचालनालयाकडून(ED) तपासणी केली जात असल्याचे सूद यांनी सांगीतले. यानंतर आयएसआयचे महासंचालक आसिफ गफूर यांनी दीपिकाचे कौतुक केल्याचेही सूद म्हणाले.

2017 मध्ये अनिल मुसरतच्या मुलीचे लग्न झाले. या लग्न सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रीटींनी हजेरी लावली. या लग्नात रणवीर सिंग, हृतिक रोशन, सोनम कपूर, अनिल कपूर, सुनील शेट्टी आणि करण जोहरसारखे स्टार्स दिसले. अनिल कपूर अनिल मसरतला 25 वर्षांपासून ओळखतो आणि त्याचे कौटुंबिक संबंधही आहेत. सोनम कपूरच्या लग्नातही अनिलही मसरत दिसला होता.

Non Stop LIVE Update
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.