धर्मेंद्र यांचे कुटुंब मूर्तीपूजेच्या सक्त विरोधात का आहे? ते कोणत्या धर्माला मानतात?

अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयातून घरी परतले आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा कायमच सुरू झाली आहे, विशेषतः हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी पहिल्या पत्नीसाठी घटस्फोट न घेता लग्न करण्यासाठी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याची चर्चा होती, परंतु त्यांनी नक्की कोणता धर्म मानतात तसेच त्यांचे कुटुंब मूर्तीपूजेच्या विरोधात का आहे? हे जाणून घेऊयात.

धर्मेंद्र यांचे कुटुंब मूर्तीपूजेच्या सक्त विरोधात का आहे? ते कोणत्या धर्माला मानतात?
Dharmendra and his family are strongly against idol worship,
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 13, 2025 | 3:53 PM

बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांची तब्येत गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. धर्मेंद्र यांना जुहू इथल्या घरी नेण्यात आलं असून त्यांच्यावरील पुढील उपचार घरीच सुरू राहतील, अशी माहिती समोर येत आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवारी 12 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांना घरी नेण्यात आलं आहे.

धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहीले

धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्य जवळजवळ नेहमीच चर्चेत राहीले आहे. विवाहित आणि मुले असूनही, ते हेमा मालिनीच्या प्रेमात पडले आणि या नात्याला त्यांनी लग्नाच्या टप्प्यावर नेले. असे म्हटले जाते की धर्मेंद्रपासून वेगळं होण्यासाठी त्यांची पहिला पत्नी तयार नव्हत्या. अखेर ते पत्नीपासून घटस्फोट न घेता लग्न करण्यासाठी त्यांनी लग्न होईपर्यंत इस्लाम धर्म स्वीकारला होता कारण हिंदू धर्मात ते शक्य नाही.


बॉलीवूडच्या ‘ही-मॅन’ने इस्लाम स्विकारला पण नक्की कोणता धर्म मानतात?

तथापि यामुळे त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती तेव्हा बॉलीवूडच्या ‘ही-मॅन’ने हे स्पष्टही केले होते की त्यांनी फक्त लग्न करण्यासाठी इस्लाम स्विकारला होता. पण अजूनही ते हिंदू आहेत आणि हिंदू धर्माचेच पालन करतात आणि त्याचपद्धतीने सगळे नियम पाळतात. ते इस्लाम धर्मानुसार विधी किंवा पूजा करत नाहीत. धर्मेंद्र हिंदू धार्मिक समाज आणि त्याच्याशी संबंधित विचारसरणीचे पालन करतात.

धर्मेंद्र यांचे कुटुंब मूर्तिपूजेच्या विरोधात का आहे?

धर्मेंद्र यांनी हे देखील म्हटले होते की त्यांचे कुटुंब हे आर्य समाजाचे पालन करतात. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये केली होती. त्यांचा यामागचा उद्देश वैदिक परंपरांना प्रोत्साहन देणे हा होता.दरम्यान आर्य समाजात मूर्तिपूजा, तंत्र-मंत्र, अस्पृश्यता आणि जातीय भेदभावाला सक्त विरोध करण्यात आला आहे. धर्मेंद्र आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आर्य समाजाच्या विचारणीचे पालन करतात त्यामुळे नक्कीच तेही मूर्तिपूजेच्या विरोधात असल्याचे दिसून येते.