
Dharmendra Death: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेद्र यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावलेली होती. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांच्यावर राहत्या घरी उपचार सुरु होते. पण 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मंद्र यांचं निधन झालं. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, राजकारणात देखील स्वतःची ओळख निर्माण केली. अशात धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबासह चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तेव्हा देखील अभिनेता सनी देओल आणि बॉबी देओल यांना भावुक होताना पाहण्यात आलं. अशा परिस्थितीत, आता त्याचे वडील त्यांच्यामध्ये नसल्यामुळे, त्याचं दुःख कसे असेल याची कल्पना करणं देखील खूप कठीण आहे. देव्हा दिग्दर्शक करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमा प्रदर्शित झालेला तेव्हा देखील बॉबी प्रडंच भावूक झालेला. सिनेमात धर्मेंद्र यांचं निधन होतं… मोठ्य पडद्यावर ते दृष्य पाहताना बॉबी प्रचंड भावुक झालेला.
एका मुलाखतीदरम्यान, बॉबीने सांगितलं, सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान कसा उठला आणि निघून गेला कारण तो त्याच्या वडिलांना पडद्यावर मरताना पाहू शकत नव्हता. बॉबी म्हणाला, ‘ती भूमिका माढ्या वडिलांशिवाय दुसरं कोणी चांगलं करु शकलं नसतं. मला सिनेमाची पूर्ण कथा माहिती नव्हती… सिनेमात माझ्या वडिलांचा निधन होतं.. मी संपूर्ण सिनेमा पाहिलेला नाही…’
‘करण जोहर याने सिनेमासाठी ट्रायल ठेवला होता… तेव्हा मी स्वतःचा अश्रू थांबवू शकलो नाही. माझ्या वडिलांना मरताना मी पाहू शकलो नाही… म्हणून मी तेथून निघून गोला.. सिनेमाचा शेवट मी पाहूच शकलो नाही… कारण आम्ही असेच आहोत. आम्ही एकमेकांवर प्रचंड प्रेम करतो… मला महिती होतं ती एक भूमिका आहे… पण तरी देखील मी पाहू शकलो नाही. ऍनिमल सिनेमात माझं देखील निधन होतं… तेव्हा माझी आई खूप रडली होती…’
सांगायचं झालं तर, ‘रॉकी रानी की प्रेम कहानी’ सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित झालेला. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केली होती. आता 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘एक्किस’ सिनेमात धर्मेंद्रची शेवटची झलक पाहायला मिळणार आहे.