AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra : अन् त्या एका गोष्टीमुळे धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी लिक झाली, नाही तर…

Dharmendra Death News : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. चाहत्यांना माहिती न देताच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता होती. मात्र खालील एका कारणामुळे त्यांच्या निधनाची बातमी लिक झाली.

Dharmendra : अन् त्या एका गोष्टीमुळे धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी लिक झाली, नाही तर...
Dharmendra Death News
| Updated on: Nov 24, 2025 | 5:58 PM
Share

Dharmendra Death : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या तब्येलबद्दल विविध चर्चा या रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या निधनाची अफवा उडाली होती. मात्र आता त्यांना जगाचा निरोप घेतला आहे. धर्मेंद्र यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. त्यामुळे लाखोंमध्ये त्यांचे चाहते आहेत. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहत्यांना माहिती न देताच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता होती. मात्र खालील एका कारणामुळे त्यांच्या निधनाची बातमी लिक झाली.

या गोष्टीमुळे धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी लिक झाली

आज सकाळी धर्मेंद्र यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावेळी त्यांच्या घरासमोर रुग्णवाहिका आली होती. जर ही रुग्णवाहिका घरासमोर आली नसती तर कदाचित त्यांच्या निधनाची बातमी लिक झाली नसती. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या निधनाची माहिती दिली जाण्याची शक्यता होती. मात्र घरासमोर रुग्णवाहिका आल्यामुळे धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी समोर आली.

धर्मेंद्र यांना 6 मुले

धर्मेंद्र यांना दोन पत्नी असून 6 मुले आहेत. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे नावे प्रकाश कोर तर दुसऱ्या पत्नीचे नाव हेमा मालिनी आहे. प्रकाश कौर यांना चार मुले तर हेमा मालिनी यांना 2 मुले आहेत. 6 मुले तर 13 नातवंडे असा मोठा परिवार धर्मेंद्र यांचा आहे. धर्मेंद्र यांनी 1954 मध्ये प्रकाश कौरशी पहिले लग्न केले. त्यांना चार मुले झाली. सनी देओल, बॉबी देओल, विजेता देओल आणि अजिता देओल ही त्यांची नावे आहेत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या दोन मुली आहेत. ईशा देओल आणि अहाना देओल. ईशाने आई वडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये काम केले. मात्र दुसरी मुलगी चित्रपटांपासून दूर आहे.

बॉलिवूड सेलिब्रिटींनी घेतले अंत्यदर्शन

धर्मेंद्र यांच्यावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. धर्मेंद्र यांना शेवटचा निरोप देण्यासाठी आमिर खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार हे बॉलिवूड सेलिब्रिटी स्मशानभूमीत पोहोचले होत. त्यामुळे या परिसरात पोलीसांचा मोठा फौजफाटा पहायला मिळाला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...