हेमा मालिनी यांच्याकरिता धर्मेंद्र होते प्रचंड चिंतेत, थेट गृहमंत्री अमित शाह यांना फोन करत..

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन 89 व्या वर्षी झाले. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, त्यांनी राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर चाहतेही दु:खी आहेत. देओल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हेमा मालिनी यांच्याकरिता धर्मेंद्र होते प्रचंड चिंतेत, थेट गृहमंत्री अमित शाह यांना फोन करत..
Dharmendra Hema Malini Amit Shah
| Updated on: Dec 15, 2025 | 4:11 PM

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांच्यासाठी तीन प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. धर्मेंद्र यांच्यासाठी मुंबईत प्रार्थना सभा सनी देओल आणि बॉबी देओल यांनी ठेवली होती. या प्रार्थना सभेला जवळपास सर्व बॉलिवूड कलाकार पोहोचले. मात्र, हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन्ही मुली या प्रार्थना सभेपासून दूर राहल्या. असे सांगितले जाते की, देओल कुटुंबाकडून त्यांना कोणत्याही पद्धतीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. दुसरीकडे हेमा मालिनी यांनी दिल्ली आणि मथुरेत धर्मेंद्र यांच्यासाठी प्रार्थना सभा ठेवली. यादरम्यान हेमा मालिनी या भावूक होताना दिसल्या. त्यांच्या डोळ्यातील अश्रू अजिबातच थांबत नव्हते. कधीही असे वाटले नाही की, धर्मेंद्र यांच्याकरिता असे प्रार्थना सभेचे आयोजन करावे लागेल. धर्मेंद्र यांच्या जाण्याने हेमा मालिनी तुटल्या आहेत. धर्मेंद्र असे अचानक जातील, असे अजिबातच वाटले नव्हते.

यादरम्यानच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धर्मेंद्र यांच्या एका पत्राबाबत आणि फोन कॉलबद्दल मोठी माहिती सांगितले आहे. धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेला पोहोचल्यानंतर अमित शाह यांनी म्हटले की, मी येथे केंद्रीय गृहमंत्री म्हणून नाही तर धर्मेंद्र यांचा चाहता म्हणून आलोय. यादरम्यान बोलताना धर्मेंद्र यांनी म्हटले की, मला एकदा धर्मेंद्र यांनी फोन केला होता.

धर्मेंद्र यांनी मला काळजीने फोन केला होता. धर्मेंद्र यांना हेमा मालिनी यांच्या विजयाबद्दल काळजी वाटत होती. धर्मेंद्रजींनी मला एक पत्रही लिहिले होते, ज्यात त्यांनी हेमा मालिनी यांच्या निवडणुकीबद्दल आपली चिंता व्यक्त स्पष्टपणे लिहिली होती. हेमाजी त्यांच्या मतदारसंघातून चांगल्या मतांनी निवडून याव्यात, असे त्यांना वाटत होते आणि तसेच झाले. हेमा मालिनी यांचा शानदार विजय झाला.

अमित शाह यादरम्यान धर्मेंद्र यांचे काैतुक करतानाही दिसले. ‘शोले’ चित्रपटातील त्यांची भूमिका आजही लोकांच्या आठवणीत आहे. धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील राहत्या घरी त्यांचे निधन झाले. मात्र, देओल कुटुंबाकडून धर्मेंद्र यांच्या निधनानंतर गुप्तता पाळण्यात आली. हेच नाही तर धर्मेंद्र यांचे शेवटचे दर्शनही चाहत्यांना मिळाले नाही. साधा फोटोही बघायला मिळाला नाही. यामुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी देओल कुटुंबाबद्दल आहे.